पिंपरी-चिंचवड बंदला नागरिकांचा प्रतिसाद; पोलिसांचा चोख बंदोबस्त
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: September 9, 2023 10:56 AM2023-09-09T10:56:55+5:302023-09-09T10:59:25+5:30
पोलिसांचा चोख बंदोबस्त...
पिंपरी : जालना येथील घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय तसेच सर्व संघटनांच्या वतीने आज (दि.९ ) पिंपरी चिंचवड बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला लोकांचा प्रतिसाद दिसून येत आहे. मराठी मोर्चाला पाठींबा म्हणून रावेत, निगडी, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता पिंपरी चिंचवड पूर्णपणे बंद राहणार आहे. यावेळी शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त लावला आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त...
आंदोलनादरम्यान शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त लावला आहे. पिंपरी येथील आंदोलनासाठी चार अधिकारी, १० सहायक पोलीस निरीक्षक/ पोलीस उपनिरीक्षक, ९० कर्मचारी आणि १ आरसीपी कंपनी असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.