नागरिकांनी सहकार्य करावे

By admin | Published: April 27, 2017 05:03 AM2017-04-27T05:03:53+5:302017-04-27T05:03:53+5:30

पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. सर्वसामान्य नागरिकांनीही

Citizens cooperate | नागरिकांनी सहकार्य करावे

नागरिकांनी सहकार्य करावे

Next

भोसरी : पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. सर्वसामान्य नागरिकांनीही पोलीस कर्मचाऱ्यांना मदत करून शहर गुन्हेगारीमुक्त करावे, असे आवाहन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले आहे. भोसरी विधानसभा मतदार संघांतर्गत विविध पोलीस ठाण्यांना आयुक्त रश्मी शुक्ला यांनी भेट दिली. या दौऱ्यात चिखली येथील नियोजित पोलीस ठाण्याच्या जागेचीही पाहणी करण्यात आली.
या वेळी आमदार महेश लांडगे यांच्यासह महापौर नितीन काळजे, सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, अप्पर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप कुलकर्णी, पोलीस निरीक्षक अजय भोसले, तसेच क्रीडा समिती सभापती लक्ष्मण सस्ते, नगरसेवक संजय नेवाळे, कुंदन गायकवाड, राहुल जाधव, सारिका बोऱ्हाडे, राजेंद्र लांडगे, सोनाली गव्हाणे आदी उपस्थित होते.(वार्ताहर)

Web Title: Citizens cooperate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.