पाणीकपातीमुळे नागरिकांची तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 01:25 AM2019-03-04T01:25:13+5:302019-03-04T01:26:36+5:30

पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात आवठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Citizenship of water due to watercolor | पाणीकपातीमुळे नागरिकांची तारांबळ

पाणीकपातीमुळे नागरिकांची तारांबळ

googlenewsNext

पिंपरी : पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात आवठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. वेळापत्रकाचा ताळमेळ न जुळल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे. पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेतर्फे केले आहे. मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. रावेत येथील बंधाऱ्यातून महापालिका दिवसाला धरणातून ४८० एमएलडी
पाणीउपसा करते. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा जपून वापर करण्यासाठी दिवसाला ४४० दक्षलक्ष लिटर एवढ्याच पाण्याचा उपसा करण्याचे जलसंपदा विभागाने महापालिकेला कळविले आहे. धरणात गेल्या वर्षी याच दिवशी धरणात साठ टक्के साठा होता. तो आता ४९ टक्के साठा आहे. दहा टक्क्यांनी साठा कमी झाला आहे.
>शहरातील विविध भागांत आठवड्यातून एक दिवस अशी होईल पाणीकपात...
सोमवार : प्राधिकरण सेक्टर २५, २७, २७ अ, २८, २४, निगडी, ओटास्कीम, आकुर्डी, कुदळवाडी ते देहू-आळंदी रस्ता उजवी बाजू, बालघरेवस्ती, भैरवनाथ मंदिर परिसर, वडाचा, थेरगाव गावठाण संदीपनगर, विजयनगर परिसर, चिंचवडगाव वेताळनगर, केशवनगर, काकडे पार्क, प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह परिसर, सुदर्शननगर, यशोमंगल परिसर, हिंदुस्थान बेकरी, विजयनगर तानाजीनगर, नाशिकफाटा, कासारवाडी, म.न.पा. शाळा परिसर, कुंदननगर, विशालनगर झोपडपट्टी तसेच मोशीतील गायकवाड वस्ती, नागेश्वरनगर, इंद्रायणीपार्क, गणेशनगर, नंदनवन, मोशी गावठाण, लक्ष्मीनगर, बनकरवस्ती, पांडवनगर १ ते ४, सहकार कॉलनी, शिवशंकर १ ते ४, देवकर वस्ती, महादेवनगर, बालाजीनगर, संत तुकारामनगर.
मंगळवार : प्राधिकरण सेक्टर २३, २४, २६, दत्तवाडी आकुर्डी सेक्टर २८, सिद्धिविनायक नगरी, कुदळवाडी ते देहू-आळंदी रस्ता डावी बाजू, हरगुडे वस्ती, महाराष्टÑ वजन काटा, काळेवाडी तापकीरनगर, जयमल्हार, कॉलनी, अशोका सोसायटी, गोकुळ परिसर, पिंपरीकॅम्प, मिलिंदनगर, अशोक थिएटर, पिंपरीनगर, भाटनगर, गांधीनगर झोपडपट्टी, बजरंगनगर, बकाऊ वुल्फ कॉलनी, मोशी सस्तेवाडी, आल्हाटवस्ती, बोºहाडेवाडीतील वाघेरेनगर, विनायकनगर, संजय गांधीनगर, बोºहाडेवाडी, पंचशील हॉटेल, सावतामाळीनग, दिघीरोड, गवळीनगर, राधानगरी, रामनगरी, संभाजीनगर.
बुधवार : आकु र्डी गावठाण, पंचतारानगर, विवेकनगर, तुळजाईवस्ती, चिखलीतील रामदासनगर, महादेवनगर, गीताई कॉलनी, लोंढे वस्ती, पाटीलनगर, लक्ष्मणनगर, गणेशनगर, कस्पटे, गणेशनगर, पडवळनगर, मातोश्री कॉलनी, बेलठिकानगर, वाकड गावठाण, भगवाननगर, भुजबळ वस्ती, कोयते वस्ती, भूमकर चौक परिसर, शिनमंदिर, ताथवडे, पिंपळे सौदागर, कुंजीर कॉलनी, सुदर्शननगर, वैदूवस्ती, जवळकरनगर, खराळवाडी, कामगारनगर, खराळाई मंदिर, मोशीतील शिवाजीवाडी, नागेश्वर विद्यालयामागील भाग, भोसरी गावठाण, भगत वस्ती, गुळवे वस्ती, शांतीनगर, दिघी गावठाण, विजयनगर, काटेवस्ती, महादेवनगर, भारतमातानगर, कृष्णानगर, महादेवनगर, कासारवाडी गेटखालचा भाग
गुरुवार : मोहननगर, साईमंदिर, इंदिरानगर, आॅटोक्लस्टर, एम्पायर, काळभोरनगर, दवा बाजार, चिंचवड रेल्वे स्टेशन परिसर, आनंदनगर झोपडपट्टी, त्रिवेणीनगर, तळवडे, गावठाण, मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, ताम्हाणेवस्ती, सोनवणेवस्ती, चिखलीपर्यंत, रहाटणी, गजानननगर, नखातेवस्ती खालचा भाग, तांबे शाळा परिसर, रहाटणी लिंकरस्ता, रहाटणीतील शिवराजनगर, नखातेवस्ती, कोकणे चौक, रामनगर, कुणाल आयकॉन, शिवार हॉटेल मागील भाग, रहाटणी गावठाण, पिंपळे गुरव, कवडेनगर, काटेपूरम, मयूरनगरी, काशिदनगर, भालेकरनगर ते गंगोत्रीनगर, गजानननगर ते नेताजीनगर, विनायकनगर, तसचे फुलेनगर झोपडपट्टी, उदयमनगर, गवळीमाथा, झोपडपट्टी नाशिकफाटा ते फुगेवाडी भाग, आनंदनगर भोसरी.
शुक्रवार : संभाजीनगर व शाहूनगर, यमुनानगर, रुपीनगर, जगताप डेअरी तसेच कस्पटेवस्ती, विशालनगर, पिंपळे निलख गावठाण, जुनी सांगवी व नवी सांगवीतील नायडू टाक्यांवरील सर्व भाग, नेहरूनगरातील गंगानगर, महेशनगर, डी. वाय़ पाटील कॉलेज परिसर, मोशी सेक्टर चार ते सहा, गंधर्वनगरी व खानदेशनगर, से. ७ व १० येथील निवासी भाग, चºहोली येथील डॉ. डी. वाय. पाटील संकुल, पठारे मळा, बुर्डे वस्ती, काळजेवाडी, कोतवालवाडी, चºहोली गावठाण़
शनिवार : कृष्णानगर, शिवतेजनगर, घरकुल, पूर्णानगर, शरदनगर, अजंठानगर, किवळे व विकासनगर, मामुर्डी, पुनावळे रावेत गावठाण, वाकड इंदिरा कॉलेज, काळाखडक, पंडित पेट्रोलपंप, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, प्रेरणा शाळा, चिंतामणीनगरी, रेलिवहार, चिंचवडेनगर, रजनीगंधा सोसायटी, नागसेननगर, संततुकारामनगर यशवंत चौक, वल्लभनगर, मोशीतील आदर्शनगर, संत तुकारामनगर, फुलेनगर, रामनगर, राधाकृष्णनगर, सद्गुरुनगर, महादेवनगर, मॅगेझीन टाक्यांवरील गणेशनगर, गजानननगर, पठारे कॉलनी, साईनगरी, लक्ष्मीनारायणनगर, ताजणेमळा, गोखलेमळा
रविवार : जाधववाडी से. १६ व १३, जाधववाडी परिसर, आहेरवाडीमधील पेठा व बोलाईचा मळा, राजे शिवाजीनगर, चिखली-मोशी शीव रस्ता, आकुर्डी डी़ वाय़ पाटील कॉलेज परिसर, गुरुद्वारा, वाल्हेकरवाडी गावठाण, इस्कॉन मंदिर, वाकड स्वामी विवेकानंदनगर, सुखदा कॉलनी, चिचंवड प्रेमलोक पार्क, उद्योगनगर, क्वीन्स टाऊन, भोईरनगर, पांढारकर चाळ, सुखनगरी, पवनानगर, रस्टन कॉलनी, वेताळनगर, पिंपरी अजमेरा वास्तू उद्योग, म्हाडा कॉलनी, मोरवाडी, वडमुखवाडी अलकापुरम, काळी भिंत, वडमुखवाडी, चोवीसावाडी, लांडेवाडी, गव्हाणे वस्ती, शीतलबाग, गावठाण, बोपखेलगाव, रामनगर, गणेशनगर, साई पार्क, माऊलीनगर, परांडेनगर, दत्तनगर, आदर्शनगर, शिवनगरी.

Web Title: Citizenship of water due to watercolor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.