शहराची पिछाडी जिव्हारी- पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 03:15 AM2018-08-22T03:15:43+5:302018-08-22T03:15:59+5:30

राहण्यायोग्य शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड शहर पिछाडीवर गेले

City backlash Javari-municipal commissioner Shravan Hardikar | शहराची पिछाडी जिव्हारी- पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर

शहराची पिछाडी जिव्हारी- पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर

Next

पिंपरी : राहण्यायोग्य शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड शहर पिछाडीवर गेले. या अपयशाला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला होता. ‘राहण्यायोग्य शहरांच्या यादीत अपयश का आले? या कारणांचा शोध घेण्यात येणार असून, केंद्राला जो अहवाल पाठविण्यात आला, त्याचा अभ्यास करून चौकशी करणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
केंद्र सरकारच्या वतीने राहण्यायोग शहरांची यादी जाहीर झाली. त्यात पिंपरी-चिंचवडला ६९ वा क्रमांक मिळाला. पहिल्या दहामध्ये असणारे शहर पिछाडीवर गेले असल्याने सत्ताधाºयांसह विरोधकांनीही टीका केली. याबाबत ‘लोकमत’ने दिनांक ‘निष्क्रीय प्रशासन, उद्योगनगरीची पिछाडी’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यात केंद्राने दिलेल्या निकशांची पूर्तता न केल्याने, प्रशासनामुळे कसे अपयश आले, हे आकडेवारीसह मांडले होते. खासगी संस्थेवर भिस्त ठेवल्याने महापालिकेचा कार्यभार बुडाल्याचेही जनतेसमोर आणले होते. त्यानंतर सत्ताधारी भाजपाने अपयशाचे खापर प्रशासनावर फोडले. तर विरोधी पक्षानेही या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. सामाजिक संस्थांनीही चौकशीची मागणी केली होती.
स्मार्ट सिटी अंतर्गत आपल्या शहराचे विकासाचे नियोजन आपण केले आहे. त्यामुळे नागरिकांना चांगल्या सुविधा देणे, जीवन सुसह्य करणे हा उद्देश असणार आहे. भविष्यात राहण्यायोग्य शहरांच्या यादीत निश्चितच पिंपरी-चिंचवडचे स्थान असणार आहे.’’

केंद्र सरकारच्या वतीने नुकत्याच जाहीर केलेल्या राहण्यायोग्य शहरांच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहराला अपयश का आले, याला जबाबदार कोण? या कारणांचा शोध घेतला जाणार आहे. अभ्यास केला जाणार आहे. तसेच केंद्राकडून आलेले निकषांची पूर्तता करण्यात यश किंवा अपयश याचाही शोध घेतला जाणार आहे. कारणांचा शोध घेऊन नव्याने उपययोजनाही करण्यात येणार आहेत. आपले शहर राहण्यायोग्य करण्यासाठी भविष्यात प्रयत्न केले जाणार आहेत. सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरण, पादचारी मार्ग, सायकल शेअरिंग याचाही विचार केला जाणार आहे, असे हर्डीकर यांनी सांगितले.

Web Title: City backlash Javari-municipal commissioner Shravan Hardikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.