शहरवासियांचा अपेक्षाभंग

By Admin | Published: December 22, 2015 01:11 AM2015-12-22T01:11:47+5:302015-12-22T01:11:47+5:30

महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्याच्या घोषणेने शहरवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, नंतर अचानक या योजनेतून वगळल्याने शहरवासीयांचा अपेक्षाभंग झाला.

City dwellers' disappointment | शहरवासियांचा अपेक्षाभंग

शहरवासियांचा अपेक्षाभंग

googlenewsNext

पिंपरी : महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्याच्या घोषणेने शहरवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, नंतर अचानक या योजनेतून वगळल्याने शहरवासीयांचा अपेक्षाभंग झाला.
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून शहराचा आणखी विकास साधता येईल, अशी अपेक्षा लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि शहरवासीयांना होती. या योजनेसाठी ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे महापालिका पात्र ठरली. मात्र,
नंतर अचानकपणे शहराला या योजनेतून वगळण्यात आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यावरून शहरवासीयांनी संताप व्यक्त केला. विविध स्तरांतून निषेधही करण्यात आला. लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी दिल्लीत मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. शहरावर अन्याय झाल्याची भावना शहरातील नागरिकांमध्ये आहे.
तर महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीने अजब कारभाराचे प्रदर्शन केले. वाकड येथील भुयारी मार्ग आणि थेरगावातील रस्त्यांसाठी ठेकेदाराला काम सुरू होण्याअगोदरच साडेदहा कोटी रुपये देण्याचा ‘आश्चर्यकारक’ निर्णय घेतला. मात्र, याबाबत
उपरती झाल्यानंतर वाढीव खर्चाच्या दोन्ही उपसूचना मागे घेण्यात
आल्या. यामुळे कारभाऱ्यांकडून सुरू असलेला ‘उद्योग’ शहरवासीयांसमोर आला.
महापालिकेने आणलेले क्षयरोग तपासणी यंत्र वापराविना पडून असल्याच्या प्रकरणात तीन वैद्यकीय अधिकारी दोषी आढळले.
या अधिकाऱ्यांवरील कारवाईचा प्रस्ताव महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी दप्तरी दाखल करण्याचा ठराव केला होता. मात्र, हा ठराव ‘लोकहिताविरुद्ध’ असल्याचे सांगत तो रद्द करण्याचा आदेश राज्य सरकारने महापालिकेला दिला. त्यातून चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभाऱ्यांना थेट राज्य सरकारकडून चपराक बसली.
काळभोरनगर प्रभागातील राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक अविनाश टेकावडे यांची हत्या झाली. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या प्रभागाची पोटनिवडणूक जाहीर झाली.
खराळवाडीतील क्षेत्रीय सभेत झालेला राडा लांच्छनास्पद होता. हा प्रकार शहरासाठी लाजिरवाणा
ठरला. महिला बचत गटांनी
उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेकडून भरविल्या जाणाऱ्या पवनाथडी जत्रेचे ठिकाण कोठे असावे, हा मुद्दा यंदाही चर्चेचा बनला.
अखेर अजित पवार यांनी
सूचना दिल्यानंतर पिंपरीतील एचए मैदानावर जत्रा भरविण्याचे निश्चित झाले. (प्रतिनिधी)

Web Title: City dwellers' disappointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.