शहर हगणदरी मुक्तीचा संकल्प
By admin | Published: August 17, 2016 12:49 AM2016-08-17T00:49:30+5:302016-08-17T00:49:30+5:30
नगर परिषद कार्यक्षेत्रात स्वच्छ तळेगाव, सुंदर तळेगाव, आपले तळेगाव या अभियानांतर्गत हगणदरीमुक्त शहर करण्याबाबतचा संकल्प नगर परिषदेने केला आहे.
तळेगाव दाभाडे : नगर परिषद कार्यक्षेत्रात स्वच्छ तळेगाव, सुंदर तळेगाव, आपले तळेगाव या अभियानांतर्गत हगणदरीमुक्त शहर करण्याबाबतचा संकल्प नगर परिषदेने केला आहे.
यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान योजनेंतर्गत वैयक्तिक योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाकडून १२ हजार अनुदान मिळणार आहे. तसेच १४व्या वित्तआयोग योजनेंतर्गत पाच हजार व नगर परिषदेच्या स्वनिधीतून पाच हजार असे एकूण २२ हजार रुपये अनुदान वैयक्तिक शौचालय बांधण्याकरिता उपलब्ध करून दिले जाणार आहे. नगर परिषद हद्दीतील स्वत:चे शौचालय नसलेल्या व स्वमालकीची जागा असलेल्या नागरिकांना याबाबतचा लाभ घेता येईल. उघड्यावर शौचास बसणारे नागरिक आढळून आल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र नगर परिषद व नगरपंचायती कायद्यान्वये पोलिसांची मदत घेऊन कारवाई करण्यात येईल, याची नोंद नागरिकांनी घ्यावी.
नगर परिषदेने या वर्षी एकूण २० सीटचे शौचालय नागरिकांना उपलब्ध करून दिले आहे व तसेच एफआरपी पद्धतीचे चार सीटचे सात व दोन सीटचे १२ असे एकूण ३२ सीटचे शौचालय नगर परिषदेने नागरिकांना उपलब्ध करून दिले आहेत.
ज्याप्रमाणे ज्या नागरिकांकडे स्वत:चे शौचालय नाही व स्वत:चे शौचालय बांधण्यासाठी जागा नाही अशा बाबतीत कम्युनिटी टॉयलेटची संकल्पना नगर परिषदेतर्फे राबविण्यात येणार आहे. अशा नागरिकांनी समूह स्थापन करून नगरपरिषदेकडे संपर्क साधावा.
घर तिथे शौचालय बांधण्यासाठी अनुदान देऊन शहर निर्मल करण्याचा नगर परिषदेचा मानस आहे. सभापती किशोर भेगडे, पक्षप्रतोद बापूसाहेब भेगडे, उपनगराध्यक्ष गणेश खांडगे, नगराध्यक्षा शालिनी खळदे, मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी नागरिकांना शहर स्वच्छ करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. (वार्ताहर)