शहरातील मद्यालये अखेर सुरू: दोन दिवसांत पावणेचारशे जणांना परवाना वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 11:35 PM2017-09-06T23:35:06+5:302017-09-06T23:35:36+5:30

महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावरील मद्यालये बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात आणखी स्पष्टता आल्याने शहर हद्दीतील सर्व मद्यालये सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

The city's liquor balls begin at the end: licensing of two-and-a-half-month-long distribution distribution | शहरातील मद्यालये अखेर सुरू: दोन दिवसांत पावणेचारशे जणांना परवाना वितरण

शहरातील मद्यालये अखेर सुरू: दोन दिवसांत पावणेचारशे जणांना परवाना वितरण

Next

पिंपरी : महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावरील मद्यालये बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात आणखी स्पष्टता आल्याने शहर हद्दीतील सर्व मद्यालये सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवाना पोहोच पावती देण्यास मंगळवारपासून (दि. ५) सुरुवात केली असून, बुधवारी सायंकाळपर्यंत ३७० मद्यालयांना पोहोच पावती देण्यात आली. पुढील दोन दिवसांत हा आकडा ८५० पर्यंत जाईल.
सोमवारी राज्य सरकारने अध्यादेशाद्वारे शहर हद्दीतील परवाने सुरु करण्याचा आदेश काढला होता. त्यानुसार मंगळवारी सुटीच्या दिवशी देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय सुरु ठेवण्यात आले होते. या बाबत माहिती देताना पुणे रेस्टॉरंट्स अ‍ॅण्ड हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ५५४ वाईन्स शॉप्स आणि बार होते. त्यातील ८१ टक्के व्यावसायिकांना फटका बसला होता. मार्च अखेर सर्वच मद्य विक्रेत्यांनी परवाना शुल्काचे पैसे भरले होते. त्यामुळे आता पोहोच पावती दिल्यानंतर ते तत्काळ मद्यालये सुरु करु शकतात. सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू राज्य विरुद्ध के. बालू अणि इतर जणांच्या याचिकेवर महामार्गलगतच्या मद्यालयांना बंदी घातली होती. महामार्गालगतच्या २० हजार लोकसंख्येपेक्षा कमी असलेल्या ठिकाणी २२० मीटर आणि त्या पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांना ५०० मीटर अंतराचे बंधन होते. महामार्गालगतच्या पाचशे मीटर अंतरावरील तब्बल १६ हजार मद्यालयांना फटका बसला होता.

Web Title: The city's liquor balls begin at the end: licensing of two-and-a-half-month-long distribution distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.