शहरातील तरण तलाव फुल्ल

By admin | Published: April 24, 2017 04:40 AM2017-04-24T04:40:34+5:302017-04-24T04:40:34+5:30

शाळेला लागलेल्या सुट्या व उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काटेपुरम चौकातील कै. काळुराम जगताप जलतरण तलाव शौकिनांच्या गदीर्ने ‘ओव्हर फ्लो’

The city's swimming pool is full | शहरातील तरण तलाव फुल्ल

शहरातील तरण तलाव फुल्ल

Next

पिंपळे गुरव : शाळेला लागलेल्या सुट्या व उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काटेपुरम चौकातील कै. काळुराम जगताप जलतरण
तलाव शौकिनांच्या गदीर्ने ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने शौकिनांना तिकिटांसाठी तासंतास ताटकळत उभे राहवे लागत आहे.
पुरुषांसाठी दोन व महिलांसाठी दोन अशा दिवसभरात चार बॅच होतात. प्रत्येक बॅचमध्ये शंभर शौकिनांना प्रवेश दिला जातो. त्यासाठी चार जीवरक्षकांची गरज आहे. मात्र कर्मचारयांची संख्या अपुरी असल्यामुळे दोन ते तीन जीवरक्षकांवरच ही जबाबदारी पार पाडली जाते. बहुतांश शौकिन पोहण्याचा आनंद घेण्यासाठी तलावावर येतात. मात्र तिकीट मिळविण्यासाठी उन्हात तासन्तास ताटकळत उभे राहवे लागत आहे. यामुळे अनेक शौकिनांना तिकीट न मिळाल्यामुळे पोहण्यांपासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत पालिकेच्या संबंधित प्रशासनाने लक्ष घालून शौकिनांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)

Web Title: The city's swimming pool is full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.