मतदान जनजागृतीमध्ये नागरिकांचा पुढाकार
By admin | Published: February 20, 2017 02:41 AM2017-02-20T02:41:40+5:302017-02-20T02:41:40+5:30
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व स्तरांतील नागरिक पुढे येऊन मतदान जनजागृतीमध्ये सहभागी होत आहेत. शहरातील सनदी
पिंपरी : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व स्तरांतील नागरिक पुढे येऊन मतदान जनजागृतीमध्ये सहभागी होत आहेत. शहरातील सनदी लेखापाल यांनीदेखील मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंतराव माने यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निगडी येथिल इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटन्ट आॅफ इंडिया या संस्थेच्या पश्चिम विभागाच्या वतीने शहरातील सनदी लेखापालांसाठी आयोजित बैठकीत मतदान जनजागृतीबाबत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी प्रसिद्धी कक्षप्रमुख तथा सहायक आयुक्त अण्णा बोदडे, चार्टर्ड अकाउंटन्ट आॅफ वेस्टर्न इंडिया चॅप्टरचे अध्यक्ष सुहास गार्डी, उपाध्यक्ष रवींद्र नेर्लीकर, सचिव युवराज तावरे, एम. सी. एम संतोष संचेती, रमेश भोसले, तसेच बहुसंख्येने सनदी लेखापाल संख्येने उपस्थित होते.
या वेळी प्रसिद्धी कक्षप्रमुख तथा सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनीही मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष सुहास गार्डी यांनी प्रास्ताविक केले. प्राजक्ता चिंचोलकर यांनी सूत्रसंचालन केले.(प्रतिनिधी)
लोकशाही समृद्ध व बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करून महानगरपालिकेत विकासाची कामे करणारे नगरसेवक निवडून द्यावेत. त्याचप्रमाणे प्रभागाचा विस्तार झाल्याने या वेळी प्रत्येक नागरिकाला प्रभागातून चार नगरसदस्य निवडून द्यावयाचे आहेत. अ गटासाठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका, ब गटासाठी फिकट गुलाबी रंगाची मतपत्रिका, क गटासाठी फिकट पिवळ्या रंगाची मतपत्रिका, तर ड गटासाठी फिकट निळ्या रंगाची मतपत्रिका असणार आहे. आणि चारही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनवरील प्रत्येकी एक बटण दाबून मतदान करावे, असे आवाहनही डॉ. माने यांनी केले.