By admin | Published: February 8, 2017 11:21 PM2017-02-08T23:21:05+5:302017-02-08T23:21:05+5:30
शास्तीकरात सवलत मिळाल्याचा दावा
Next
पिंपरी : महापालिकेची रणधुमाळी रंगात येत असताना अनधिकृत बांधकामे शास्तीचा निर्णय झाला आहे, शासनाने अधिसूचना काढून तीन टप्प्यांत सवलत दिली आहे. त्यामुळे एक लाख मिळकतधारकांना फायदा होणार असल्याचा दावा भाजपाने केला आहे.यासंबंधी कोणतीही अधिकृत अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध नसल्याचे दिसून आले.
पिंपरी-चिंचवड शास्तीकरात राज्य शासनाने दिलेल्या सवलतींची माहिती देण्यासाठी पिंपरी-चिंचवड भाजपतर्फे आज पत्रकार परिषद बोलवली होती. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, राज्यलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, सरचिटणीस बाबू नायर, ज्योती ओव्हाळ आदी उपस्थित होते.
शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी संबंधित अधिसूचनेच्या छायाप्रती पत्रकारांना दिल्या.
जगताप म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकामाच्या बाबतीत प्रतिवर्षी मालमत्ता कराच्या दुप्पट दराने शास्ती आकारण्याची तरतूद केली होती. मात्र, ८जानेवारीमध्ये काढलेल्या शासन निर्णयात सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार सहाशे चौरस फुटापर्यंतचे निवासी बांधकामाला शास्तीची आकारणी नाही. त्यापुढे एक हजार चौरस फुटापर्यंत निवासी बाधकांमाना प्रतिवर्षी मालमत्ता कराच्या पन्नास टक्के शास्ती आकारावी. तसेच त्यापुढील निवासी बांधकामास प्रतिवर्षी मालमत्ताकराच्या दुप्पट दराने शास्ती आकारावी हा आदेश अकरा जानेवारीला शासनाने प्रसिद्ध केला आहे.’’
आदेश आणि चर्चा
भाजपच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार संकेतस्थळावर संकेतिक क्रमांकाने अधिसूचना उपलब्ध असल्याचे भाजपाने सांगितले. मात्र, यासबंधी महाराष्ट्र शासानाच्या संकेतस्थळावर शास्तीकरातील सुधारणेचा आठ आणि अकरा जानेवारी दरम्यान कोणतीही अधिसूचना उपलब्ध नाही. त्यामुळे या आदेशाबाबत चर्चा आहे.
जगताप म्हणाले, ‘‘भाजपाने १२५ जागांवर अधिकृत उमेदवार दिले असून तीन उमेदवार पुरस्कुत केले आहेत. भोसरीतील गवळीनगर, थेरगाव आणि वाकड अशा तीन प्रभागात उमेदवार पुरस्कृत केले आहेत. तसेच आरपीआचीही मनधरणी केली आहे. त्यांना पिंपरी, दापोडी, किवळे, यमुनानगर आणि वाकड येथील जागा सोडल्या आहेत. आरपीआयचे उमेदवार भाजपाच्या पक्षचिन्हावर लढणार आहेत. एकोणीस आणि वीस हे प्रभाग आणि संततुकारामनगर हा प्रभाग संवेदनशील जाहीर करावा.’’