क्लासचालकांची मनमानी

By Admin | Published: April 24, 2017 04:55 AM2017-04-24T04:55:06+5:302017-04-24T04:55:06+5:30

खासगी क्लासचालकांकडून केली जाणारी शुल्क वाढ, प्रवेश देण्यासाठी मनाप्रमाणे असलेली क्लासची वेगवेगळी नियमावली

Classmates' arbitrariness | क्लासचालकांची मनमानी

क्लासचालकांची मनमानी

googlenewsNext

पिंपरी : खासगी क्लासचालकांकडून केली जाणारी शुल्क वाढ, प्रवेश देण्यासाठी मनाप्रमाणे असलेली क्लासची वेगवेगळी नियमावली यामुळे पालक हैराण झाले आहेत. यांसह भरमसाठ फी घेऊन प्रवेश दिल्यानंतर त्याच क्लासमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला कमी गुण मिळाल्यास पुढील वर्गासाठी प्रवेश नाकारला जातो, अशाप्रकारच्या क्लासचालकांच्या मनमानी कारभारामुळे पालक वैतागलेले आहेत.
शाळेमध्ये शिकणा-या पाल्याला चांगले व दर्जेदार शिक्षण देण्याची पालकाची इच्छा असते. स्पर्धेत व गुणवत्तेत आपला मुलगा पुढे रहावा. यासाठी शाळेतील शिक्षणासह पालकांकडून खासगी क्लासदेखील लावले जातात. अशा प्रकारचे क्लास घेणाऱ्यांची संख्याही
पिंपरी-चिंचवड शहरात अधिक आहे. मात्र, अनेक क्लासचालकांकडून विविध कारणावरून पालकांची अडवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
अगोदरच शाळांकडून मोठ्याप्रमाणात आकारण्यात येणारे शुल्क, पुस्तके, गणवेश, सहल यांसह शाळेतील इतर कार्यक्रमांचे शुल्क या खर्चांमुळे पालक मेटाकुटीला आलेले असतात. अशातच खासगी क्लासमुळे तर अधिकच आर्थिक बोजा पडत आहे. खासगी क्लास चालकांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने मनमानी पद्धतीने वसुली केली जात आहे. याबाबत नागरिकांनी तक्रार केली आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Classmates' arbitrariness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.