‘टॉयलेट लोकेटर’द्वारे स्वच्छतागृहांची माहिती

By admin | Published: July 17, 2017 04:09 AM2017-07-17T04:09:00+5:302017-07-17T04:09:00+5:30

पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू आहे. केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्याने नागरिकांना स्मार्ट सुविधा

Cleanroom Information by 'Toilet Locator' | ‘टॉयलेट लोकेटर’द्वारे स्वच्छतागृहांची माहिती

‘टॉयलेट लोकेटर’द्वारे स्वच्छतागृहांची माहिती

Next

विश्वास मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू आहे. केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्याने नागरिकांना स्मार्ट सुविधा पुरविण्याचे काम महापालिकेच्या वतीने केले जाणार आहे. शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. टॉयलेट लोकेटर हे अ‍ॅप विकसित करण्यात येणार असून राज्यातील पहिला प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवडचा समावेश झाला आहे. तसेच अमृत योजना आणि स्वच्छ भारत अभियानाअंतर्गतही विविध योजना राबविण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हगणदारी मुक्त शहरे करण्याचे काम वेगाने सुरू आहे. आता स्मार्ट सिटी योजनेत प्रामुख्याने नागरिकांना स्मार्ट सुविधा देण्यास प्राधान्य असणार आहे. याचाच एक भाग म्हणजे शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील विविध शहरांमध्ये सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छतागृह दर्शवणारे टॉयलेट लोकेटर अ‍ॅप विकसित केले जाणार आहे.
शहरातील विविध रस्त्यावरील पेट्रोल पंप, मॉल, दवाखाने, रेल्वे स्थानके, बस स्थानके आदी ठिकाणी असणारे सार्वजनिक स्वच्छतागृहे, सामुदायिक स्वच्छतागृहांची एकत्रित माहिती अ‍ॅपमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने क्वॉलिटी कॉन्सिल आॅफ इंडियाच्या मदतीने हे अ‍ॅप विकसित केले जाणार आहे. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. स्वच्छतागृहांची माहिती गुगल मॅपवर टाकण्यात येणार आहे. त्याअगोदर महापालिकेच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. संबंधित अ‍ॅपवर आपण परिसराचे नाव टाकल्यानंतर सार्वजनिक स्वच्छतागृह कोठे आहे, त्याचा पत्ता छायाचित्रासह उपलब्ध होणार आहे. अ‍ॅपचा उपक्रम देशातील दिल्ली, गुडगाव, फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा, इंदूर, भोपाळ या शहरांमध्ये राबवविला आहे. अशा प्रकारचे अ‍ॅप विकसित करणारी पिंपरी-चिंचवड महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका असणार आहे.

Web Title: Cleanroom Information by 'Toilet Locator'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.