मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लीक करणे तरुणीला पडले दोन लाखांना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 12:12 PM2022-09-28T12:12:06+5:302022-09-28T12:12:42+5:30

अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल...

Clicking on the link on the mobile phone cost the girl two lakhs | मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लीक करणे तरुणीला पडले दोन लाखांना

मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लीक करणे तरुणीला पडले दोन लाखांना

Next

पिंपरी : फ्री लान्सिंगसाठी मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लिक केल्याने एका तरुणीला एक लाख ८८ हजारांचा फटका बसला. तरुणीला लिंकद्वारे रजिस्टर करण्यास सांगून तिच्याकडून पैसे घेत फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पुनम हिरामन गीते (वय २३, देहुगाव) हिने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला तिच्या व्हॉट्स-ॲपवर फ्री लान्सिंगसाठी एक लिंक आली होती. त्याच्यावर फिर्यादीने क्लीक केल्यानंतर एका तरुणीचा फोन फिर्यादीला आला. ५०० रुपये नोंदणी फी भरण्यासाठी संबंधित तरुणीने सांगितले. त्यानंतर वेळोवेळी लिंकद्वारे फिर्यादीला पैसे भरण्यास सांगून तब्बल एक लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Clicking on the link on the mobile phone cost the girl two lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.