चिंचवड रेल्वे स्थानकावर बसविले कोच गाईडन्स डिस्प्ले बोर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 04:54 PM2019-04-05T16:54:48+5:302019-04-05T16:55:08+5:30
पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस, नांदेड-पनवेल एक्सप्रेस, पुणे-इंदूर एक्सप्रेस, पुणे-ग्वाल्हेर एक्सप्रेस, पुणे-नाशिक मार्गे भुसावळ एक्सप्रेस या गाड्यांना चिंचवड येथे येता-जाताना थांबा आहे.
पिंपरी : चिंचवड रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सोयीकरीता कोच गाईडन्स डिस्प्ले बोर्ड बसविण्यात आले आहेत. लोणावळ्याकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील फलाट क्रमांक तीनवर सोमवारपासून हे बोर्ड कार्यान्वित होणार आहेत. पिंपरी रेल्वे स्थानकातही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस, नांदेड-पनवेल एक्सप्रेस, पुणे-इंदूर एक्सप्रेस, पुणे-ग्वाल्हेर एक्सप्रेस, पुणे-नाशिक मार्गे भुसावळ एक्सप्रेस या गाड्यांना चिंचवड येथे येता-जाताना थांबा आहे. १५ एप्रिलपासून मुंबई, कोकणवासी, गोवा, कर्नाटक, केरळवासीयांसाठी पुणे-एनार्कुलम - पुणे हमसफर हॉलिडे विशेष संपूर्ण वातानुकूलित एक्सप्रेसला जाताना व येताना चिंचवड येथे थांबा मिळाला आहे. मात्र या गाड्या रेल्वे स्थानकात येण्यापूर्वी फलाटावर नेमका कुठे कोणता डबा येईल, याचा अंदाज प्रवाशांना येत नव्हता. त्यामुळे जेष्ठ नागरिक, महिला, गरोदर प्रवासी आदींची गैरसोय होते. एक्सप्रेस गाडी चिंचवड रेल्वे स्थानकात फलाटावर थांबल्यानंतर प्रवासाचे सामान, लहान मुले, महिला आदींची धावपळ होत होती. यात काही प्रवाशांना योग्य डब्यात प्रवेश करणे शक्य होत नव्हते अशा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र कोच गाईडन्स डिस्प्ले बोर्ड ही सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. स्थानकात थांबा असलेल्या गाडीच्या डब्यांची स्थिती काय असेल, कोणता डबा नेमका कुठे असेल, त्यासाठी फलाटावर नेमके कुठे प्रतीक्षा करावी आदी बाबी प्रवाशांना वेळीच लक्षात येणार आहेत. त्यामुळे गाडी स्थानकात आल्यानंतर प्रवासी योग्य डब्यात जाऊ शकतात.
अनेक गाड्या पुणे रेल्वे स्थानकापर्यंत धावतात. त्यामुळे चिंचवड रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर सध्या ही सुविधा नाही, असे अधिकाºयांकडून सांगण्यात येत आहे. परंतू मुंबई, कोल्हापूर एक्सप्रेस दुपारी बाराच्या सुमारास येथे थांबते. या शहरातील सातारा, कºहाड, सांगली, मिरज, कोल्हापूरपर्यंत जाणारे प्रवासी तिकीटे आरक्षित करतात.
चिंचवड येथे आरक्षण केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी होती. चिंचवड प्रवासी संघाने ही मागणी लावून धरली होती. त्यानुसार चिंचवडला १९९७ मध्ये आरक्षण केंद्र सुरू केले. त्यामुळे चिंचवड येथे थांबा असलेल्या विविध एक्सप्रेस गाड्यांसाठीही तिकीटांचे आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध झाली.
पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना नाही सुविधा
पनवेल, नांदेड गाडी सायंकाळी ६.४० वा. येते त्यात दौंड, कुडुर्वाडी, लातूर, नांदेडकडे जाणाºया प्रवाशांची संख्या मोठी आहे. मुंबई, पंढरपूर सोमवार, मंगळवार, बुधवार व मुंबई-बीजापूर शुक्रवार, शनिवार, रविवारी थांबते या दोन्ही एक्सप्रेस गाड्यांना २० डबे असतात. या गाड्यांतून बीजापूर किंवा पंढरपूरकडे जाणाºया प्रवाशांची संख्या जास्त आहे. ८ डबे दररोज तेथे इंजीन जोडून शिर्डीपर्यंत जातात. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याकडे जाणाºया ह्यअपह्ण मार्गावरील फलाट क्रमांक दोनवर ह्यकोच गाईडन्स डिस्प्ले बोर्डह्ण बसविण्यात यावेत, अशी मागणी आहे.
आरक्षित तिकिटांतून अडीच कोटींचे उत्पन्न
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या २५ लाखांपर्यंत आहे. यात देशाच्या कानाकोपºयातून येथे स्थलांतरीत झालेल्या नागरिकांचा मोठी संख्या आहे. असे नागरिक रेल्वेने मोठ्या संख्येने प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी असे प्रवासी रेल्वेच्या आरक्षण सुविधेचा लाभ घेतात. मार्च महिन्यात चिंचवड येथील आरक्षण केंद्रातून सुमारे ४० हजार प्रवाशांनी त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी तिकीटे आरक्षित केली. त्यामाध्यमातून रेल्वेला २ कोटी ५० लाखांपर्यंत उत्पन्न मिळाले.
पिंपरी स्थानकातही सुविधेची मागणी
प्रवासी वाहतूक करणाऱ्या काही गाड्यांना २४ डबे असतात. त्यांना चिंचवड येथेही थांबा आहे. मात्र फलाटाची लांबी कमी असल्याने या गाड्यांच्या प्रवाशांची गैरसोय होते. ते टाळण्यासाठी फलाटाची लांबी वाढविण्यात यावेत. छताची दुरुस्ती करण्यात यावी. पिंपरी रेल्वे स्थानकात कोल्हापूर, मुंबई, सिद्धेश्वर एक्सप्रेस, पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस थांबते तेथेही डिस्प्ले बोर्ड बसविण्यात यावेत, अशी मागणी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, नारायण भोसले, निर्मला माने, जबीन इफ्तेखारी, . मनोहर सावंत, तात्या मंजूगडे, मुकेश चुडासमा, सूरज आसदकर, नंदू भोगले, उषा दामले, शरद चव्हाण आदींकडून करण्यात आली आहे.