नेत्यांच्या वर्चस्वाला कोलदांडा

By admin | Published: May 10, 2017 04:13 AM2017-05-10T04:13:00+5:302017-05-10T04:13:00+5:30

भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वीकृत सदस्यपदी कोणाची वर्णी लागणार? निवडणुकीत पराभूत झालेल्यांना संधी देणार की

Coalition of Leaders | नेत्यांच्या वर्चस्वाला कोलदांडा

नेत्यांच्या वर्चस्वाला कोलदांडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वीकृत सदस्यपदी कोणाची वर्णी लागणार? निवडणुकीत पराभूत झालेल्यांना संधी देणार की पक्ष संघटनेचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणार, की नेत्यांच्या बगलबच्च्यांना संधी देणार या विषयीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. सुमारे पाच तासांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पक्षनेत्यांनी नावे दिली आहेत. वर्चस्ववादात अडकलेल्या भाजपातील स्थानिक नेत्यांच्या बगलबच्च्यांना स्थान न देता, पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाने सदस्यपदी संघटन सरचिटणीस माऊली थोरात, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे यांना, तर राष्ट्रवादीने भाऊसाहेब भोईर, संजय वाबळे यांना संधी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची एकमुखी सत्ता आली आहे. उमेदवारी देण्यापासून तर विविध पदे देण्यात स्थानिक नेत्यांमध्ये वर्चस्ववादाचे राजकारण दिसून आले. खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यात धुसफूस सुरू असल्याचे दिसते.
निवडणुकीनंतर आमदार लांडगे गटाचे नितीन काळजे यांना महापौरपद, तर जगताप समर्थक सीमा सावळे यांना स्थायी समिती अध्यक्षपद आणि निष्ठावान कार्यकर्ते एकनाथ पवार यांना सत्तारूढ पक्षनेतेपद दिले होते. नव्या-जुन्यांची मोट बांधण्याचे काम नेत्यांनी केले होते. काही प्रमाणात स्थानिक नेत्यांमध्ये शह-काटशहाचे राजकारण दिसून आले. त्यानंतर स्वीकृत सदस्यपदी कोणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. स्वीकृतपदी नेत्यांच्या बगलबच्च्यांना संधी देऊ नये, यासाठी जुन्या कार्यकर्त्यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती.
स्वीकृत सदस्यपदासाठी माजी विरोधी पक्षनेत्या उमा खापरे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश पदाधिकारी महेश कुलकर्णी, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शैला मोळक, संघटन सरचिटणीस माऊली थोरात, माजी नगरसेवक शंकर जगताप, अमर मूलचंदानी, सारंग कामतेकर, शांताराम भालेकर, विजय फुगे, सचिन लांडगे, मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस बाबू नायर, सूरज बाबर, निहाल पानसरे यांची नावे चर्चेत होती.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, नारायण बहिरवाडे, विजय गावडे, संजय वाबळे, उल्हास शेट्टी, जालिंदर शिंदे, तानाजी खाडे, नीलेश पांढरकर, सेवा दलाचे आनंदा यादव यांच्या नावाची चर्चा होती.

Web Title: Coalition of Leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.