नादब्रह्म व सुवर्णरत्नमध्ये रंगला वन मिनीट गेम शो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 06:41 AM2017-08-30T06:41:54+5:302017-08-30T06:41:56+5:30
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकमततर्फे घेण्यात आलेल्या वन मिनीट गेम शोला वारजे येथील नादब्रह्म सोसायटीत नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
वारजे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकमततर्फे घेण्यात आलेल्या वन मिनीट गेम शोला वारजे येथील नादब्रह्म सोसायटीत नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सादरकर्ते, समालोचक संदीप पाटील यांनी उपस्थितांना संगीताच्या तालावर ठेका धरायला लावला.
रविवारी संध्याकाळी अचानक पावसाने हजेरी लावल्याने येथील क्लब हाऊसमध्ये बाप्पांच्या सान्निध्यात हा कार्यक्रम भक्तांच्या प्रचंड उत्साहात झाला. यात सर्वप्रथम एका पाठोपाठ एक अशा सलग तीन गाण्यांची संगीताची धून वाजवण्यात आली व उपस्थितांना ती धून ओळखण्यास सांगण्यात आले. यातील दोन्ही विजेत्यांना भेटवस्तू व गिफ्ट व्हाउचर देण्यात आले. यानंतर उपस्थितांचा फिटनेस तपासण्यासाठी संदीप पाटील यांनी काहींना दोरीवरील उड्या मारायला लावल्या. यातीलही अधिक उड्या मारणाºयांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. यातही पहिल्या आजींनी किती उड्या मारल्या, या गुगली प्रश्नाचे अचूक उत्तर देणारा अनिरुद्ध पाटील यालाही भेटवस्तू देण्यात आली.
सर्वांत शेवटी जमलेल्या जास्तीत जास्त लोकांना संगीताच्या तालावर रॅम्प वॉक करण्यास सांगण्यात आले. यातही महिला व काही पुरुषांनीही भल्याभल्या मॉडेल्सना लाजवेल अशा प्रकारची पोज दिली. यातील साडीचा पदर वापरून दिलेली पोज तर अगदीच कल्पक होती. संपूर्ण कार्यक्रमात गीतसंगीताची रेलचेल होती. परत लवकरच पुन्हा कार्यक्रम घेण्याची हमी देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
बक्षीसविजेते -
ऋषिकेश टेबे, ज्योती पवार, अश्विनी गाडगीळ, स्नेहल भोळे, प्रियंका मेहता, अनिरुद्ध पाटील, उपेंद्र दसरे, अमेय शहळगाव, स्वप्निल पेडे, रवींद्र शिंदे, मुकुंद पाटील, मंदार टेंबे, मोनिका पाटील, कृती तिवारी, दीक्षा नाईक, पायल पवार व श्रुती टेंबे.
विविध स्पर्धांना महिलांचा प्रतिसाद
कर्वेनगर : सुवर्णरत्न गार्डन सोसायटीत लोकमततर्फे कार्यक्रम व निवेदक संदीप पाटील यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी या स्पर्धेत भाग घेतला. या सोसायटीमधील अनेक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या ठिकाणी दोरीवरील उड्या, गाण्यांच्या स्पर्धा तसेच सामाजिक प्रश्नमंजूषा लोकमतकडून सादर करण्यात आली. सोसायटीमधील महिला, ज्येष्ठ नागरिक, बाळगोपाळांसह मान्यवर उपस्थित होते. या ठिकाणी प्रत्येक स्पर्धकाला लोकमतकडून बक्षिसे देण्यात आली. लोकमतला सामाजिक हिताची जाण आहे, तळमळ आहे. अनेक समाजहिताचे विषय लोकमतकडूनच नागरिकांना समजतात, अशी प्रतिक्रिया खर्डेकर यांनी व्यक्त केली.