आयुक्तांनी आदेश घेतला मागे; आरोग्य वैद्यकीय अधिका-यावरील कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 06:03 AM2017-11-02T06:03:10+5:302017-11-02T06:03:20+5:30
महापालिकेतील सत्ताधा-यांच्या दबावाखाली आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांचे वित्तीय अधिकार काढून घेण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मागील आठवड्यात दिला होता.
पिंपरी : महापालिकेतील सत्ताधा-यांच्या दबावाखाली आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांचे वित्तीय अधिकार काढून घेण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मागील आठवड्यात दिला होता. मात्र, एकाच अधिकाºयावर कारवाई का, अशी टीकेची झोड उठल्यानंतर आयुक्तांनी चूक दुरुस्त केली आहे. वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांना प्रदान केलेले ५ लाखांचे खरेदीचे अधिकार काढून घेतले आहेत.
पालिकेत सत्तांतर झाल्यापासून भाजपाच्या पदाधिकाºयांच्या दबावाला प्रशासन बळी पडत आहेत. वैद्यकीय विभागाच्या खरेदीत रस असणाºया एका खासदाराच्या पाठबळाने आरोग्य वैद्यकीय अधिकाºयास पदावनत करून दुसºया अधिकाºयाची वर्णी लावण्याचा ठराव करण्यात आला होता. हा विषय महासभेपुढे येण्यापूर्वीच ‘पदा’चा वाद कोर्टात गेला. त्यातच डॉ. अनिल रॉय यांनी पदाधिकाºयांवर आर्थिक लागेबांध्याचे आरोप केल्याने गोंधळ उडाला उडाला होता. याप्रकरणी आयुक्तांनी त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. तसेच कारणे दाखवा नोटिसा, वित्तीय अधिकार काढून घेण्याचे आदेश दिले होते.
पदाधिकाºयांच्या दबावाला बळी पडून आयुक्तांनी ही कारवाई करीत असताना याच विभागातील वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांना प्रदान करण्यात आलेले पाच लाख खरेदीचे अधिकार कायम ठेवले होते. त्यामुळे आयुक्तांवर टीकेची झोड उठविली गेली.
विसंगती उजेडात
‘आयुक्तांच्या दबावामुळे कारवाई’बाबत ‘लोकमत’ने वृत्तही प्रकाशित केले होते. त्यामुळे टीकेची झोड उठल्याने आयुक्तांनी सुधारित आदेश काढला आहे. सुधारित आदेश १ नोव्हेंबरला जारी केला. त्यानुसार डॉ. साळवे, डॉ. देशमुख यांना प्रदान करण्यात आलेले खरेदीचे अधिकार काढून घेतले आहेत.