पिंपरीची मेट्रो निगडीपर्यंत धावणार, महामेट्रोला प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी आयुक्त देणार पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 01:32 AM2017-11-25T01:32:09+5:302017-11-25T01:32:20+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालय ते निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात यावा. त्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉपोर्रेशनला पत्र देण्याची सूचना स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी केली आहे.

Commissioner's letter to create plan for Mahamatro project, to run till Pimpri's Metro corridor | पिंपरीची मेट्रो निगडीपर्यंत धावणार, महामेट्रोला प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी आयुक्त देणार पत्र

पिंपरीची मेट्रो निगडीपर्यंत धावणार, महामेट्रोला प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी आयुक्त देणार पत्र

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालय ते निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात यावा. त्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉपोर्रेशनला पत्र देण्याची सूचना स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे निगडीपर्यंत मेट्रो करण्यासाठी किती खर्च येणार आहे, याची महाराष्ट्र रेल कॉपोर्रेशनकडून माहिती मागविण्यात यावी, असे कळविले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये पुणे मेट्रो प्रकल्प राबविण्याचे काम जोरात सुरू आहे. पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते पिंपरीपर्यंत मेट्रोचा मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोची सहा स्टेशन असणार आहेत. त्या अंतर्गत नाशिक फाटा येथे मेट्रो प्रकल्पाचे पिलर उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. पिंपरीच्या मार्गावर उभारण्यात येत असलेल्या अन्य पिलरचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, मेट्रोचा प्रकल्प निगडीपर्यंत राबविण्याची शहरातील नागरिकांची मागणी करीत आहेत.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉपोर्रेशनच्या अधिकाºयांना महापालिकेत बोलावून निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्प राबविण्याबाबत सविस्तर चर्चा केली. निगडीपर्यंत मेट्रो करण्याची नागरिकांची मागणी रास्त असल्याने त्यावर अंमलबजावणी गरजेचे असल्याचे सावळे यांनी सांगितले. निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी काय काय प्रशासकीय कार्यवाही करणे अपेक्षित आहे, याची अधिकाºयांकडून माहिती घेतली. संबंधित अधिकाºयांनीही निगडीपर्यंत मेट्रो करण्यात काहीच अडचण नसल्याचे सावळे यांनी सांगितले.
>नागरिकांच्या शंकांच्या निरसनासाठी सहयोग केंद्र
पिंपरी : पिंपरी ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. त्याविषयी नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी महा मेट्रोतर्फे वल्लभनगर एसटी स्थानकाशेजारी ‘सहयोग केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. हे केंद्र दिवसभर खुले असून, नागरिकांनी माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन महा मेट्रोचे प्रकल्प अधिकारी सुनील म्हस्के यांनी केले.
सहयोग केंद्रात नागरिकांना माहिती देण्यासाठी महा मेट्रोचे चार प्रतिनिधी या केंद्रात सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत कार्यरत असतील. या सहयोग केंद्रांत मेट्रोची माहिती पुस्तिका उपलब्ध असून, मेट्रोचे मार्ग, स्थानके, मेट्रोमुळे नागरिकांना होणारे फायदे आदींची माहिती उपलब्ध आहे. याशिवाय पर्यावरण संवर्धनासाठी महा मेट्रोतर्फेराबविण्यात येत असलेले हरित उपक्र म, अपघातात होणारी घट, प्रदूषणाचे कमी होणारे परिणाम, स्थानिकांना मिळणारा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार, प्रवासाचा कमी होणारा वेळ अशा प्रकारची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे, अशी माहिती म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी उपअभियंता बापूसाहेब गायकवाड व प्रकाश गायकवाड उपस्थित होते.
>सोशल मीडियाचा वापर
पुणे मेट्रो वेबसाइट, फेसबुक पेज, टिष्ट्वटर, यू-ट्यूब यावर प्रकल्पाची होणारी प्रगती व आवश्यक माहिती देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबरोबरच नागरिकांना आपल्या सूचना, माहिती व तक्र ारी यादेखील या सहयोग केंद्रात मांडता येणार आहेत.

Web Title: Commissioner's letter to create plan for Mahamatro project, to run till Pimpri's Metro corridor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.