महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध
By admin | Published: February 17, 2017 04:54 AM2017-02-17T04:54:13+5:302017-02-17T04:54:13+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून महिलांसाठी व बचत गटांसाठी अनेक कल्याणकारी योजना आहे. त्या योजना सर्वसामान्य
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून महिलांसाठी व बचत गटांसाठी अनेक कल्याणकारी योजना आहे. त्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच महिला सक्षमीकरण करण्यासाठी राष्ट्रवादीचा पॅनल कटिबद्ध आहे, असे मत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी महिला मेळाव्यात व्यक्त केले.
वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, दळवीनगर प्रभाग क्र. १७ मधील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब भोईर, राजेंद्र साळुंखे, आशा सूर्यवंशी, शोभा तानाजी वाल्हेकर यांनी प्रचारासाठी प्रेमलोक पार्कमध्ये महिला मेळावा घेण्यात आला. त्या वेळी भोईर बोलत होते. या वेळी विनोद मालू, सुनील जाधव, यशवंत शिंदे, धीरज शिंदे, चंद्रमौली जिला,सचिन चावरे, कंकाळे, श्रीमती संध्या महाजन, अनिता गायकवाड सुषमा वैद्य आदी उपस्थित होते.
राजेंद्र साळुंखे म्हणाले, ‘राष्ट्रवादी कॉँग्रेसने महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी या योजना राबविल्या आहेत. प्रभागात बचत गटांचा मिळून महाबचतगट तयार करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून मोठा उद्योग सुरु करण्यात येईल.’’ ‘‘महिलांनी स्वत:च्या पायावर उभ्या राहून छोटे-मोठे व्यवसाय सुरु केले आहेत, असे आशा सूर्यवंशी यांनी सांगितले.
शोभा वाल्हेकर म्हणाल्या, ‘‘प्रभागातील महिलांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा पॅनल काम करणार आहे. शहरातील महिलांना जसा या योजनेचा फायदा झाला आहे.’’ (प्रतिनिधी)