कंपनी, फर्मला पैसे देण्याचा बहाणा, अकाउंटंटनेच दीड कोटी हडपले; म्हाळुंगे इंगळेतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 03:12 PM2024-06-22T15:12:30+5:302024-06-22T15:13:04+5:30

हा प्रकार १ एप्रिल ते २८ एप्रिल या कालावधीत म्हाळुंगे इंगळेतील पतोडीया फोर्जिंग अँड गिअर्स लिमिटेड कंपनीत घडला....

company, on the pretext of paying the firm, the accountant himself grabbed one and a half crores; Incident in Mhalunge Ingle | कंपनी, फर्मला पैसे देण्याचा बहाणा, अकाउंटंटनेच दीड कोटी हडपले; म्हाळुंगे इंगळेतील घटना

कंपनी, फर्मला पैसे देण्याचा बहाणा, अकाउंटंटनेच दीड कोटी हडपले; म्हाळुंगे इंगळेतील घटना

पिंपरी : कंपनीच्या असिस्टंट मॅनेजर अकाउंटंटने वेगवेगळ्या कंपनी आणि फर्म यांना पैसे देण्याच्या बहाण्याने एक कोटी ४० लाख रुपयांचा अपहार केला. हा प्रकार १ एप्रिल ते २८ एप्रिल या कालावधीत म्हाळुंगे इंगळेतील पतोडीया फोर्जिंग अँड गिअर्स लिमिटेड कंपनीत घडला.

याप्रकरणी सूर्यकांत दशरथ वाघमारे (वय ५०, रा. चाकण) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महादेव राम जाधव (वय ४०, रा. कडाचीवाडी, ता. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी आणि संशयित दोघेही पतोडीया फोर्जिंग अँड गिअर्स लिमिटेड या कंपनीत काम करतात. महादेव जाधव यांच्याकडे कंपनीत माल पुरवणारे व्हेंडर कंपनी आणि फर्मना कामाच्या स्वरूपानुसार पैसे देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. जाधवने १ ते २८ एप्रिल या कालावधीत कंपनीच्या वेगवेगळ्या व्हेंडर कंपनी आणि फर्मना एक कोटी ४० लाख रुपये दिल्याचे दर्शवले. ती रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर जमा केली. त्याने कंपनीच्या रकमेचा अपहार करून विश्वासघात केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: company, on the pretext of paying the firm, the accountant himself grabbed one and a half crores; Incident in Mhalunge Ingle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.