आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे : सजन हंकारे
By admin | Published: February 14, 2017 02:01 AM2017-02-14T02:01:45+5:302017-02-14T02:01:45+5:30
‘‘निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. गावाच्या शांततेला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही
बारामती : ‘‘निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. गावाच्या शांततेला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी,’’ असे आवाहन पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी केले.
नीरा नरसिंहपूर येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसंदर्भात आयोजित शांतता बैठकीत पोलीस निरीक्षक हंकारे यांनी मार्गदर्शन केले.
हंकारे म्हणाले, की निवडणुकीच्या काळात ग्रामस्थांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. गावाच्या शांततेला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
मतदानाच्या वेळी कोणी गैरप्रकार केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. कोणाच्या दबावाला बळी न पडता लोकशाही पद्धतीने
मतदान करा. दरम्यान, या वेळी
हंकारे यांनी मतदान बूथची पाहणी केली. या वेळी अण्णा काळे, संतोष मोरे, विकास ताटे बैठकीसाठी उपस्थित होते. (वार्ताहर)