पोलीस आयुक्तांसाठी व्यूहरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 07:01 AM2018-06-01T07:01:51+5:302018-06-01T07:01:51+5:30

स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाबाबतचा शासनाचा अध्यादेश नुकताच जारी झाला असून, पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक

Configuration for Police Commissioner | पोलीस आयुक्तांसाठी व्यूहरचना

पोलीस आयुक्तांसाठी व्यूहरचना

Next

संजय माने
पिंपरी : स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाबाबतचा शासनाचा अध्यादेश नुकताच जारी झाला असून, पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या व्यक्तीची आयुक्तपदावर नेमणूक केली जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
आगामी लोकसभा, विधानसभेची २०१९ ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सत्ताधारी भाजपाकडून आयुक्तपदासाठीच्या अधिकाºयांच्या नावाची शिफारस होणार आहे. त्यातही पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र आयुक्तालय होणार आहे़ त्या ठिकाणी पोलीस आयुक्त कोण असावेत? यासंदर्भात स्थानिक आमदारांच्या शिफारशीला अधिक महत्त्व दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. निवडणूक लढण्याची पूर्वतयारी करताना, पक्ष संघटन, कार्यकर्ते, पदाधिकारी यांची बांधणी, निधीची उपलब्धता, मतदारांवर प्रभाव याचबरोबर पोलीस यंत्रणेचा खुबीने वापर याचाही विचार राजकीय मंडळी वरिष्ठ पातळीवर करत असतात. निवडणुकीच्या तोंडावर पोलीस अधिकाºयांच्या बदल्या केल्या जातात. आयुक्तालय कोणाच्या मतदारसंघात असावे, यापासून ते तेथे महत्त्वाच्या पदावरील अधिकारी कोण असावेत? याची राजकीय पातळीवर व्यूहरचना केली जात आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाºयास नव्या पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त होण्याचा बहुमान मिळणार आहे. राजकीय समीकरणे कशीही जुळविली जात असली तरी नव्या आयुक्तालयाचे पहिले आयुक्त होण्यास अनेक अधिकारी इच्छुक आहेत.

पोलीस खात्यातील अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाºयांमध्ये रितेश कुमार, प्रज्ञा सरवदे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील बिपीन के़ सिंग, व्ही. व्ही. फणसाळकर, नवी मुंबई येथील पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असलेले हेमंत नगराळे, नागपूरचे पोलीस आयुक्त के़ व्यंकटेशन, दहशतवाद विरोधी पथकाचे अतुलचंद्र कुलकर्णी, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे संजय कुमार, महामार्ग सुरक्षा, वाहतूक विभागाचे आऱ के़ पद्मनाभन, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे एस़ जगन्नाथन, रेल्वे विभागाचे जयजित सिंग, स्पेशल आॅपरेशन्स विभागाचे डी़ कनकरन्तनम, राज्य इंटलिजन्स विभागाचे संजय बर्वे, ठाणे शहराचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग तसेच सुबोध जैस्वाल आदींचा समावेश आहे. या अधिकाºयांपैकी एक अधिकारी लवकरच नव्या पोलीस आयुक्तालयाच्या आयुक्तपदी विराजमान होणार आहेत.

Web Title: Configuration for Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.