संभ्रम कायम! सचिन अहिर यांच्याकडून राहुल कलाटेंची मनधरणी; कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 12:42 PM2023-02-10T12:42:28+5:302023-02-10T12:45:52+5:30

राहुल कलाटे यांनी राजकीय भवितव्याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा

Confusion continues! Rahul Kalat's encouragement from Sachin Ahir; Will decide after talking to workers... | संभ्रम कायम! सचिन अहिर यांच्याकडून राहुल कलाटेंची मनधरणी; कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार...

संभ्रम कायम! सचिन अहिर यांच्याकडून राहुल कलाटेंची मनधरणी; कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार...

googlenewsNext

पिंपरी: चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना बंडखोर राहुल कलाटे यांची भेट शिवसेनेचे सचिन अहिर आणि नेत्यांनी घेतली. सुमारे एक तास चर्चा सुरू होती. महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवत असल्याने माघार घ्यावी, अशी भूमिका पक्षाच्या नेत्यांनी मांडली आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे कलाटे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे माघार होणार की नाही याबद्दल संभ्रम कायम आहे. 

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाले आहे त्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केलेले आहे. तर शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे नेते, तसेच शिवसेनेचे नेते कलाटे यांचे समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे.

आज सकाळी अकरा वाजता शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहिर, शिवसेनेच्या महिला संघटिका सुलभा उबाळे,  शहर प्रमुख सचिन भोसले यांनी वाकड येथे येऊन कलाटे यांच्याशी चर्चा केली. यावेळी अहिर यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांची ही संवाद साधला. तसेच आघाडी धर्म म्हणून कलाटे यांनी माघार घ्यावी, अशी विनंती केली. पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांच्या भावना पोहोचविल्या.

संभ्रम कायम

विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काही तासांचा अवधी उरला आहे. पक्ष उमेदवार शिवसेना बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे माघार घेणार की नाही? याबाबत अद्याप संभ्रम आहे.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना अहिर म्हणाले, ' आम्ही आधी जागा मागत होतो, पण ती पण ती राष्ट्रवादीला गेली. राहुल कलाटे हे शिवसेनेबरोबर काम करत आहेत. आणि आता ते उमेदवार आहेत म्हणून पक्षाचा आणि उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन मी त्यांच्याकडे आलो आहे. त्यांच्याशी चर्चा केली. राजकीय भवितव्याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा असं त्यांना सांगितला आहे. पक्षप्रमुखांचीही त्यांचं बोलणे झालेला आहे. ते त्यांच्या प्रमुख सहकारी आणि कार्यकर्त्यांची चर्चा करून उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात निर्णय देतील.''

राहुल कलाटे म्हणाले, सचिन आहे यांच्यातील चर्चा संपली. चिंचवड पोट निवडणुकीतून अर्ज मागे घ्यायचा की नाही याबाबत कार्यकर्त्यांशी आणि सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. ''

Web Title: Confusion continues! Rahul Kalat's encouragement from Sachin Ahir; Will decide after talking to workers...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.