विकासासाठी काँगे्रस कटिबद्ध

By admin | Published: February 16, 2017 03:11 AM2017-02-16T03:11:07+5:302017-02-16T03:11:07+5:30

पिंपळे निलख-वाकड प्रभाग क्रमांक २६ मध्ये नागरिकांना आवश्यक सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू

Congres committed for development | विकासासाठी काँगे्रस कटिबद्ध

विकासासाठी काँगे्रस कटिबद्ध

Next

पिंपरी : पिंपळे निलख-वाकड प्रभाग क्रमांक २६ मध्ये नागरिकांना आवश्यक सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, तसेच पिंपळे निलख-वाकड आदर्श प्रभाग होण्यासाठी काँग्रेसचे सर्व उमेदवार कटिबद्ध राहतील, असा विश्वास काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक २६ मधील काँग्रसचे उमेदवार सचिन मुरलीधर साठे, भुलेश्वर नांदगुडे, मृणालताई पृथ्वीराज साठे, संजीवनी जगताप यांच्या पिंपळे निलख, पंचशीलनगर येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रादेशिक परिवहन विभागाचे निवृत्त अधिकारी प्रकाश बालवडकर यांच्या हस्ते झाले.
या वेळी उमेदवार सचिन साठे बोलत होते. ते पुढे म्हणाले, की महापालिका हद्दीत मागील १५ वर्षात झालेली अनेक विकास कामे केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून झाली आहेत. आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या नेत्यांच्या पुढाकाराने शासनाचा निधी आपल्या शहरातील विकास कामांसाठी उपलब्ध झाला.
जेएनएनयूआरएम योजनेच्या निधीतून झोपडीवासीयांचे, तसेच दुर्बल घटकासाठींचे प्रकल्प साकारले. योजना देताना कॉँग्रेस पक्षाने शहराच्या विकासावर विशेष लक्ष दिले होते. श्रेय घेण्यासाठी कोणीही पुढे येताहेत. परंतु काँग्रेस नेत्यांच्या विकासाच्या दृष्टीमुळे शहरात विकासकामे झाली. पीएमआरडीएच्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो आणि नदीसुधार योजना प्रकल्प राबविण्याचे नियोजन कॉंग्रेसनेच केले होते, त्याला मूर्त स्वरूप देता येईल.
या वेळी प्रचारप्रमुख व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे, प्रभाग क्र. २६ मधील कॉंग्रेसचे उमेदवार आणि कैलास सिंग चव्हाण, विजय जगताप, मिलिंद जगताप, सुरेश जगताप, नारायण वानखेडे, बाळासाहेब सूर्यवंशी, संगीता कांबळे, शशिकांत कांबळे, मयूर जयस्वाल, बाळासाहेब जगताप, बाळासाहेब कांबळे, सुनील भोसले, बाळासाहेब सूर्यवंशी, संगीता कांबळे, विद्या जगताप, शोभीत घाडगे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Congres committed for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.