संपर्क यंत्रणा कार्यान्वित, नागरिकांचा थेट पोलिसांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 01:41 AM2018-08-27T01:41:18+5:302018-08-27T01:41:39+5:30

पोलीस आयुक्तालय : नागरिकांना थेट नियंत्रण कक्षाशी संपर्क साधणे शक्य

The contact mechanism is operational, citizen directly communicate with the police | संपर्क यंत्रणा कार्यान्वित, नागरिकांचा थेट पोलिसांशी संवाद

संपर्क यंत्रणा कार्यान्वित, नागरिकांचा थेट पोलिसांशी संवाद

Next

पिंपरी : स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले, त्याचबरोबर संपर्क यंत्रणा कार्यन्वित झाली आहे. पोलिसांची तातडीक मदत मिळविण्यासाठी नियंत्रण कक्षाची संपर्क यंत्रणासुद्धा उपलब्ध झाली असून, नागरिकांना आता थेट नियंत्रण कक्षाशी संपर्क साधणे शक्य होणार आहे. तसेच खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गतची संपर्क यंत्रणा नागरिकांसाठी सज्ज झाली आहे. आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी सहा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ०२०-२७४५०१२२, ०२०-२७४५०६६६, ०२०-२७४५०८८८, ०२०-२७४५८९००, ०२०-२७४५०९००१, ०२०-२७४५०१२१ या दूरध्वनी क्रमांकावरून नागरिकांना नियंत्रण कक्षाला माहिती कळविणे शक्य होणार आहे. याशिवाय अत्यंत तातडीच्या वेळी नेहमीचा १०० क्रमांकसुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या कार्यालयाचे दोन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये ०२०-२७४५०४४४, ०२०-२७४५०५५५ या दोन दूरध्वनी क्रमांकाचा समावेश आहे. त्याचबरोबर अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या कार्यालयाचा क्रमांक ०२०-२७४५०१२५ असा आहे.
परिमंडल एक उपायुक्त स्मार्तना पाटील यांचे कार्यालय चिंचवड येथील जुन्या परिमंडल तीन उपायुक्त कार्यालयाच्या इमारतीत आहेत. या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२०-२७४८७७७७ असा आहे. तर परिमंडल दोनच्या उपायुक्त नम्रता पाटील यांचे कार्यालयसुद्धा सद्य:स्थितीत चिंचवड येथील जुन्या उपायुक्त कार्यालयात आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक ९९२३४७५४४० असा आहे. पोलीस उपायुक्त (प्रशासन, वाहतूक) विनायक ढाकणे यांच्या कार्यालयाचा संपर्क क्रमांक अद्याप उपलब्ध नाही. वाहतूक शाखा नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२०-२७४५०१२१ असा आहे.

पोलीस ठाण्यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे :
पिंपरी : ०२०-२७४७२२१८, चिंचवड : ०२०-२७३५६७६७/६८, निगडी : ०२०-२७६५५०८८, भोसरी : ०२०-२७१२४७२८, ०२०-२७१२४९७५ भोसरी एमआयडीसी: ०२०- २७२६११२०, ०२०- २७१३०००३, दिघी : ०२०-२०२८००३५, सांगवी : ०२०-२०२७५४५४, ०२०-२७२८६१६२, वाकड : ०२०- २७२६११२०, हिंजवडी : ०२०- २२९३४६२२, देहूरोड : ०२०-२७६७१२८८, तळेगाव दाभाडे : ०२११४-२२२४४४, तळेगाव एमआयडीसी : ०२११४-२०२३३३, आळंदी : ०२१३५-२३२२१४, चाकण : ०२१३५-२४९३३३

Web Title: The contact mechanism is operational, citizen directly communicate with the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.