दूषित पाणीपुरवठाप्रश्नी अधिकाऱ्यांना घेराव : दिघीतील कृष्णानगरमधील समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 07:05 PM2018-08-10T19:05:57+5:302018-08-10T19:10:21+5:30

दिघी परिसरातील कृष्णानगरमध्ये मागील एक महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाणीपुरवठा प्रश्नी गाºहाणे मांडण्यासाठी संतप्त नागरिक महापालिकेच्या पिंपरीतील मुख्य प्रशासकीय भवनात दाखल झाले.

contaminated water in krushnagar at dighi | दूषित पाणीपुरवठाप्रश्नी अधिकाऱ्यांना घेराव : दिघीतील कृष्णानगरमधील समस्या

दूषित पाणीपुरवठाप्रश्नी अधिकाऱ्यांना घेराव : दिघीतील कृष्णानगरमधील समस्या

Next
ठळक मुद्देसारथीवरील तक्रार बंद केल्याने नागरिकांकडून संताप नागरी समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या सारथी योजनेवर तक्रार दाखल लहान मुलांना पोटदुखी, डायरीला, थंडीतापाची लागण होऊन वृद्धांनासुद्धा शारीरिक व्याधी त्रासदायक

दिघी : दूषित पाणीपुरवठा होत असल्याने तक्रार करूनही दखल न घेण्यात आल्याने दिघीच्या कृष्णानगर येथील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. अखेरीस महापालिका आयुक्तांनाच याबाबत विचारणा करण्यासाठी काही नागरिक महापालिकेच्या पिंपरीतील मुख्य प्रशासकीय इमारतीत दाखल झाले. मात्र आयुक्त नसल्याने नागरिकांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याप्रश्नी घेराव घातला. दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन उपाययोजना का करण्यात आली नाही, असा जाबही संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांनी या वेळी विचारला.
दिघी परिसरातील कृष्णानगरमध्ये मागील एक महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी भोसरीतील ई प्रभाग विभागीय पाणीपुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. तसेच नागरी समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या सारथी योजनेवर तक्रार दाखल करण्यात आली. त्यामुळे नियमानुसार सारथीवर आलेल्या नागरी समस्या एक महिन्याच्या आत सोडवून तक्रारदारांचा अभिप्राय घेतला जातो. नंतरच ती तक्रार बंद केली जाते. असा स्पष्ट नियम महापालिकेने केला असला तरी दिघीतील कृष्णानगर भागातील रहिवाशांनी महिन्यापूर्वी दाखल केलेली दूषित पाणी समस्येची तक्रार सोडवली तर नाहीच शिवाय दाखल केलेली तक्रार कुठलाही अभिप्राय न घेता बंद करण्यात आली. ही माहिती जेव्हा नागरिकांना समजली तेव्हा नागरिकांनी थेट आयुक्तांना जाब विचारण्याची आक्रमक भूमिका घेतली. 
दूषित पाणीपुरवठा प्रश्नी गाºहाणे मांडण्यासाठी संतप्त नागरिक महापालिकेच्या पिंपरीतील मुख्य प्रशासकीय भवनात दाखल झाले. मात्र त्या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर त्यांच्या कक्षात नव्हते. कामानिमित्त आयुक्त बाहेर गेले होते. त्यामुळे नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता आयुब पठाण, कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, उप कार्यकारी अभियंता दवंडे या संबंधित अधिकाºयांना घेराव घातला. दूषित पाणीपुरवठा होत असून, त्याबाबत तक्रार करून महापालिकेने उपाययोजना का केल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित करून संतप्त नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना या वेळी जाब विचारला.
 परिसरातील पाणी समस्येचा मुद्दा अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही. महापालिकेच्या वतीने परिसरात कलेल्या चोवीस तास पाणी योजनेचे काम झाल्यापासून तक्रारी वाढल्याचे नागरिक सांगतात. कृष्णानगर भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊन अनेक साथीचे रोग पसरत आहेत. लहान मुलांना पोटदुखी, डायरीला, थंडीतापाची लागण होऊन वृद्धांनासुद्धा शारीरिक व्याधी त्रासदायक ठरत आहेत. कित्येक दिवसांपासून परिसरातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा यांनी योग्य प्रकारे लक्ष घालावे यासाठी अनेकदा नागरिकांनी समस्यांची गाºहाणी मांडत समस्या सोडविण्याची विनंती केली. मात्र ही गंभीर समस्या एक महिन्यानंतरही कायम आहे तशीच असल्यामुळे नागरिकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ प्रशासनाने आणली असल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. 
महापालिकेचा पाण्याचा टँकर अनेकदा फोन केल्यास कधीतरी येत आहे. अनेक नागरिक स्वत:च्या खचार्ने खासगी टँकर मागवत आपली तहान भागवित आहेत. दूषित पाणी मिळत असल्याची तक्रार कृष्णानगरमधील नागरिकांनी एक महिन्यापूर्वी केली होती. महिना संपल्यामुळे समस्या न सोडवताच सदर तक्रार बंद केल्याने रवी चव्हाण, सिकंदर मनियार, आनंद पाटील, चंद्रकांत देशमुख, शरद पाटील, डॉ. मधुकर गावंडे, काशिनाथ जाधव, अनिल गायकवाड, गुलाब हुसेन शिलेदार, केशव वाघमारे, मंगेश कारले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दूषित पाणीपुरवठा प्रश्नी निवेदन दिले.
.............................
दिघीमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती.  यासंदर्भात कार्यकारी अभियंता यांच्याकडून माहिती घेतली आहे. तेथील दूषित पाणीपुरवठा होत असलेली दहा ते पंधरा जोड बंद करण्यात आले आहेत. परत त्या परिसरात खोदकाम करून समस्या लवकर सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीचे काम सुरू केले आहे. तक्रार बंद का करण्यात आली याचे कारण कार्यकारी अभियंता यांना मागितले आहे.   
- आयुब पठाण, मुख्य कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

Web Title: contaminated water in krushnagar at dighi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.