रिंगरोड प्रश्नावरून आरोप-प्रत्यारोप सुरू

By Admin | Published: July 8, 2017 02:14 AM2017-07-08T02:14:30+5:302017-07-08T02:14:30+5:30

प्राधिकरणाच्या वतीने राजकीय द्वेषापोटी कारवाई सुरू आहे, अशी भूमिका खासदार श्रीरंग बारणे यांनी मांडल्यानंतर भाजपाने

Continue to accuse the ringrod question | रिंगरोड प्रश्नावरून आरोप-प्रत्यारोप सुरू

रिंगरोड प्रश्नावरून आरोप-प्रत्यारोप सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : प्राधिकरणाच्या वतीने राजकीय द्वेषापोटी कारवाई सुरू आहे, अशी भूमिका खासदार श्रीरंग बारणे यांनी मांडल्यानंतर भाजपाने रिंगरोड करायचा की नाही? रिंगरोडविषयी योग्य भूमिका मांडा असा सल्ला महापालिकेचे सभागृहनेते एकनाथ पवार यांनी दिला आहे.
एकाच भागात होणाऱ्या कारवाईबाबत प्राधिकरण प्रशासन राजकीय दबावातून कारवाई करीत आहे़ नागरिकांच्या भावना समजून घ्या, अशी टीका बारणे यांनी केली होती. त्यास एकनाथ पवार यांनी उत्तर दिले आहे. पवार म्हणाले, ‘‘राजकीय दबावाखाली रिंगरोडची कारवाई सुरू नाही. हा आरोप चुकीचा आहे. रिंगरोड करायचा की नाही? याबाबत बारणे यांची भूमिका स्पष्ट दिसत नाही. रस्ता सोडून दुसरी कोणतीही आरक्षणे विकसित करू नये, तसेच कारवाई करताना बाधितांचे पुनर्वसन करणे यासाठी पाठपुरावा सुरू आहे. पावसाळ्यात कोणतीही अतिक्रमण विरोधी कारवाई करू नये, अशी नागरिकांची मागणी होती़ त्यानुसार प्रशासनास सूचनाही दिल्या आहेत. तसेच बाधितांचे सर्वेक्षण होणेही गरजेचे आहे.’’

भाजपाचे महापालिकेतील पदाधिकारी रिमोट कंट्रोलवर चालतात, एकशे तीस दिवसांचा हिशेब द्या, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यावर एकनाथ पवार म्हणाले, ‘‘पालकमंत्री किंवा इतर नेत्यांचा महापालिकेत हस्तक्षेप नाही. एकशे तीस दिवसांचा हिशेब मागता मागील कालखंडात तुम्ही काय केले.

Web Title: Continue to accuse the ringrod question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.