विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 08:33 PM2020-02-27T20:33:29+5:302020-02-27T20:37:09+5:30

कर्जाचा हप्ता भरला नाही म्हणून विद्यार्थ्यास मानसिक त्रास दिला. त्याला कंटाळून विद्यार्थ्याने आत्महत्या केली. चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे ७ जानेवारी रोजी ही घटना घडली.

Convicted of motivating a student to commit suicide | विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next

पिंपरी : कर्जाचा हप्ता भरला नाही म्हणून विद्यार्थ्यास मानसिक त्रास दिला. त्याला कंटाळून विद्यार्थ्याने आत्महत्या केली. चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे ७ जानेवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी एका खासगी कंपनीच्या दोन कर्मचाºयांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


धनंजय जयवंत जाधव (रा. गणराज कॉलनी, देवकर वस्ती, चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मोबाइलवरून कॉल करणारा कंपनीतील एक जण आणि कंपनीचे चालक आणि मालक (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मयत धनंजय यांचे वडील जयवंत जाधव यांनी बुधवारी (दि. २६) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जयवंत यांचा मुलगा धनंजय याने खासगी कंपनीकडून दहा हजार रुपयांचे विद्यार्थी कर्ज घेतले होते. त्याचे हप्ते वेळेत भरले नव्हते. यामुळे आरोपींनी धनंजय यांना वारंवार फोन करून मानसिक त्रास देत होते. तू मर किंवा काहीही कर परंतु आम्हाला आमचे पैस देऊन टाक, असे म्हणून धनंजय याला मानसिक दिला. त्याला कंटाळून धनंजय याने राहत्या घरी पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Convicted of motivating a student to commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.