भिडे गुरूजी, एकबोटे यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, श्रीशिवप्रतिष्ठानचे पोलीस उपायुक्तांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2018 02:04 PM2018-01-07T14:04:59+5:302018-01-07T14:05:19+5:30
कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराच्या घटनेप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत. याबाबतचे निवेदन
पिंपरी - कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराच्या घटनेप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत. याबाबतचे निवेदन श्रीशिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांना रविवारी निवेदन दिले.
कोरगाव भिमा येथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेचा श्री शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला आहे. कोरेगाव भिमा येथे ज्यावेळी घटना घडली, त्यावेळी भिडे गुुरूजी सांगलीत होते. एकबोटेही बाहेरगावी गेले होते. त्या कोरेगाव भिमा घटनेशी कसलाही संबंध नाही. काही असंतुष्ट लोकांनी बनाव करून त्यांना अडकविण्याचा प्रयत्न केला आहे. असे त्यांचे म्हणणे आहे.
श्रीशिवप्रतिष्ठान हिुदंस्थान संघटनेचे पुणे जिल्हाअध्यक्ष संजय विठ्ठल जढर तसेच पिंपरी चिंचवडमधील गणेश भुजबळ, अतुल माने,धनाजी म्हस्के,संभाजी बालघरे,संतोष वाघ, सचिन थोरात, गणेश लांडगे, अक्षय तापकीर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त गणेश शिंदे तसेच वरिष्ठ पोलीस निरिक्षक विवेक मुगळीकर यांची भेट घेतली. गुन्हे मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन त्यांनी सादर केले. आपल्या मागणीची योग्य ती दखल घेतली जाईल, कायदेशीर बाबींचा विचार करून निर्णय घेण्यात येईल. कायदा, सुव्यवस्थेला बाधा होईल, असे कोणतेही कृत्य करू नका, सनदशीर मार्गाने आपले म्हणणे मांडा. अशी सूचना पोलीस उपायुक्त शिंदे यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांना केली.