गुढीपाडव्यावर " कोरोना" संकट; पिंपरी शहरात शुकशुकाट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 07:15 PM2020-03-24T19:15:14+5:302020-03-24T19:20:20+5:30
मिळकतकर, पाणीपट्टी बिले भरण्यास दोन महिने मुदतवाढ द्यावी
पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात ९८ टक्के बंदला प्रतिसाद मिळाला आहे. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांचा पिंपरी-चिंचवडबाजारपेठेत शुकशुकाट जाणवून आला. बाजारपेठ ठप्प झाली होती. सकाळी आणि सायंकाळी किराणा मालांची दुकाने, दुधविक्रेते, पेट्रोलपंप, भाजी मंडईत नागरिकांची काही प्रमाणात गर्दी झाली होती.
चीननंतर कोरोनाचे संकट भारतावर आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरात बारा रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महापालिकेडून उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच राज्य शासनाकडूनही संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व सेवा वगळून इतर सर्व व्यवसाय बंद ठेवले आहेत.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहनांची गर्दी असते. मात्र, आज या मार्गावर एखादं-दुसरे वाहन दिसत होते. तसेच शहरातून जाणाऱ्या पुणे-मुंबई महामार्गावर शुकशुकाट दिसून आला. चिंचवड, पिंपरी, भोसरी, निगडी, हिंजवडी, चिंचवड स्टेशन परिसरातील मॉलही बंद होते. दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी या रेल्वेस्थानके शुकशुकाट दिसून आला.
भाजीसाठी लगबग
अत्यावश्यक म्हणून भाजीपाला, दूध विक्री व किराणा विक्री सुरूच राहील, असे शासनाकडून सातत्याने जाहीर करण्यात येत आहे. मात्र नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. भाजी खरेदीसाठी गर्दी पिंपरीत लालबहादूर शास्त्री भाजी मंडई आहे. चिंचवड, भोसरी, दापोडी, आकुर्डी या भागातील भाजी मंडईतही सकाळी सात वाजल्यापासून गर्दी झाली होती.
कडेकोट बंदोबस्त
विनाकारण रस्त्यावरून फिरणाºयांवर पोलिसांच्या वतीने कारवाई केली जात असून शहरातील मुख्य चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त आहे. त्यामुळे या चौकांमध्ये वाहने तुरळक आहेत. मात्र पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईत गर्दी झाल्याने येथील वाहनतळात मोठ्या संख्येने वाहने आली होती. सकाळी काही प्रमाणात गर्दी होती दुपारनंतर पोलिसांनी गर्दी होऊ न देणे यासाठी प्रयत्न केले. मंडईत दुपारनंतर शुकशुकाट होता.
मिळकतकर, पाणीपट्टी बिले भरण्यास दोन महिने मुदतवाढ द्यावी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात निर्माण झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाणीपट्टी, मिळकतकर, बांधकाम परवानगी आदी अनेक बिले भरण्याची मुदत मार्चपर्यंतची मुदत दोन महिन्यांनी वाढवावी, अशी मागणी उपमहापौर तुषार हिंगे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मंगळवारी केली आहे. देशात कोरोना विषाणूचा हाहाकार पसरला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधीत रुग्णाची संख्या बारा वर पोहोचली आहे.
2 सध्या मार्च महिना चालू असून महापालिकेची पाणीपट्टी, मिळकतकर, बांधकाम परवानगी अशी अनेक बिले भरण्याची मुदत मार्चपर्यंत आहे. त्यामुळे बिले भरण्यासाठी अनेक नागरिक पालिकेच्या कार्यालयात ये-जा करताना दिसत आहेत. नागरिकांची गर्दी म्हणजेच कोरोनाचा धोका अधिक, तसेच बिले भरण्याची कामे घरातील वयस्कर मंडळी करतात. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बिले भरण्यास दोन महिन्यांची मुदतवाढ द्यावी. तसेच, नागरिकांना बिले भरण्यासाठी आॅनलाईनचा वापर करण्याचे आवाहन करावे.