Corona Virus : पिंपरी महापालिका परिसरात १ हजार १०५ नवीन कोरोना रुग्ण; २१ जणांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 08:18 PM2020-08-20T20:18:33+5:302020-08-20T20:22:46+5:30
पिंपरी-चिंचवडमध्ये संशयित रुग्णांच्या तपासण्या वाढविल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे शहरातील बाधितांची संख्या ३८ हजार ८२१ वर
पिंपरी : औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा वाढत असून दिवसभरात १ हजार १०५ रुग्ण आढळले असून, ३७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील २१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. गुरूवारी १ हजार ३३४ जणांना डिस्चार्ज दिला आहे. ५३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये संशयित रुग्णांच्या तपासण्या वाढविल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवसभरात २ हजार ०२६ जणांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले आहे. पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या नमुन्यांपैकी ५३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरातील बाधितांची संख्या ३८ हजार ८२१ वर पोहचली आहे. तर १ हजार २५२ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. १३१४ जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ६ हजार ६३१ झाली आहे.
...........................
१५५२ प्रतीक्षेत अहवाल
महापालिकेतील दाखल रुग्णांपैकी चाचणी प्रतीक्षेतील अहवालांची संख्या अधिक आहे. तर डिस्चार्ज होणाºया रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. १५५२ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. दिवसभरात ३७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरातील एकूण २५ हजार ७७० जण कोरोनामुक्त झाले आहेत.
.....................
२१ जणांचा बळी, पुरुषांची संख्या अधिक
शहरातील १७ आणि पुण्यातील ४ अशा एकुण २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात वृद्धांची, पुरुषांची संख्या अधिक आहे. आजपर्यंत ७३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.