Corona Virus : पिंपरीत गुरुवारी १ हजार ५५९ रुग्ण कोरोनामुक्त ; ७८४ नवीन रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 10:05 PM2020-09-24T22:05:51+5:302020-09-24T22:06:05+5:30
पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीत ऑगस्ट महिन्यात वाढू लागलेला कोरोना आता सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कमी झाला आहे...
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. गुरुवारी शहराच्या शहरात ७८४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून १ हजार ५५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दिवसभरात शहरातील १६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीत ऑगस्ट महिन्यात वाढू लागलेला कोरोना आता सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कमी झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या पाच दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मागील आठवड्यात दिवसाला हजार ते दीड हजार रुग्ण आढळून येत होते. मात्र, चार दिवसांपासून ही संख्या एक हजाराच्या आत आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील विविध रुग्णालयात ३ हजार ५६६ जणांना दाखल करण्यात आले होते. पुण्यातील इकडे पाठवलेल्या रुग्णाच्या घशातील।द्रवाच्या नमुन्यांपैकी ३ हजार रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ६३७ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. दिवसभरामध्ये १ हजार ५५९ जण कोरोनामुक्त झाले असून ४ हजार ०४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालयातील दाखल रुग्णांची संख्या ५ हजार ६३ झाली आहे.
............
मृतांमध्ये जेष्ठ अधिक
शहर परिसरातील १६ व पुण्यातील १४ अशा एकूण ३० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे आणि बळी घेतलेल्या मध्ये ज्येष्ठ नागरिक तसेच तरुणांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आजपर्यंत एकूण मृतांची संख्या १ हजार २०७ झाली आहे.