Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी १०७७ नवे कोरोना रुग्ण; १७ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 01:22 AM2020-08-31T01:22:25+5:302020-08-31T01:22:33+5:30
दिवसभरात ६०१ जण बरे होऊन परतले घरी..
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून, रविवारी दिवसभरात १०७७ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४८७३७ झाली. महापालिका हद्दीबाहेरील ५९ नागरिकांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दिवसभरात ६०१ जण कोरोनामुक्त झाले. तर ३५०९ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात २६९१ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले.
शहरात रविवारी दिवसभरात १७ रुग्ण दगावले असून, त्यात महापालिका हद्दीबाहेरील तीन जणांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत ८५४ तर महापालिका हद्दीबाहेरील १८५ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. तसेच ३१२८ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून ३०५६ जणांना घरी सोडण्यात आले. तर ६०३३ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ९२५ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर महापालिका हद्दीबाहेरील १८४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ३३८७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ३१४ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे.