Corona virus : पिंपरीत बुधवारी ११०४ नवीन कोरोनाबाधित; १०७१ जण कोरोनामुुुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 08:16 PM2020-09-16T20:16:08+5:302020-09-16T20:27:40+5:30
शहरामध्ये दिवसभरात ३ हजार २०२ जणांना महापालिकेच्या रुग्णालयांत दाखल केले.
पिंपरी : शहरातील १२ आणि पुण्यातील ९ अशा एकुण २१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. बुधवारी ३ हजार ०७२ जणांना डिस्चार्ज दिला आहे. १ हजार ०१७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दिवसभरात ११०४ कोरोनाचे रुग्ण आढळले असून, १ हजार ०७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. वैद्यकीय विभागाच्या वतीने शहरातील संशयित रुग्णांच्या तपासण्या वाढविल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या सामाजिक संसर्गास सुरूवात झाली आहे. मागील आठवड्यात सर्वाधिक ही संख्या दिवसाला बाराशे रुग्ण अशी पोहोचली होती. ही संख्या आता कमी होऊ लागली आहे.
दिवसभरात ३ हजार २०२ जणांना महापालिकेच्या रुग्णालयांत दाखल केले आहे. पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या नमुन्यांपैकी १ हजार ९१७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरातील बाधितांची संख्या ६६ हजार ४८३ वर पोहचली आहे. तर २ हजार ६७९ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. ३ हजार १७२ जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ६ हजार ४१५ झाली आहे.
...........................
२६७९ जणांचे अहवाल प्रतीक्षेत
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दाखल रुग्णांपैकी चाचणी प्रतीक्षेतील अहवालांची संख्या अधिक आहे. तर डिस्चार्ज होणाºया रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. २६७९ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. दिवसभरात १ हजार ७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरातील एकूण ५२ हजार ५३० जण कोरोनामुक्त झाले आहेत.
.....................
शहरातील १२ जणांचा बळी
शहरातील १२ आणि पुण्यातील ९ अशा एकूण २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात महिला- पुरुष आणि वृद्धांची संख्या अधिक आहे. आजपर्यंत १०७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.