Corona virus : पिंपरी चिंचवडमध्ये मंगळवारी ११३३ नवे कोरोनाबाधित; १३ जणांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 10:04 PM2020-07-28T22:04:32+5:302020-07-28T22:04:52+5:30
पाच हजार जणांना दिला डिस्चार्ज
पाच हजार जणांना डिस्चार्ज
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा आलेख वाढू लागला आहे. दिवसभरात पिंपरीतील ११३३ पॉझिटिव्ह आले आहेत. तर कारोनामुक्त ४३२ जण झाले आहेत. तर कोरोनाने पुणे आणि पिंपरीतील १३ जणांचा बळी घेतला आहे. ४ हजार ९५६ जणांना डिस्चार्ज दिला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही चांगले आहे. चाचण्याची संख्या वाढविल्याने सकारात्मक रूग्णाची संख्या वाढू लागली आहे. पिंपरीतील ११३३ आणि पुण्यातील ४८ अशा एकुण १ हजार १८१ जण पॉझिटिव्ह आढळले असून त्यामुळे रूग्णांची संख्या १८ हजार ३९७ वर पोहोचली आहे.
................
१२६० जणांचे अहवाल प्रतिक्षेत
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण आणि भोसरीतील रुग्णालयात आज दिवसभरात ५ हजार ६६७ रूग्ण रूग्णालयात दाखल झाले असून दोन दिवसांपूर्वी पुण्यातील एनआयव्हीत तपासणीसाठी पाठविलेल्या घशातील द्रवांचे नमुन्यांचा अहवाल आला असून शहरातील ३ हजार ९८६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १२६० जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. रूग्णालयात सध्या ३५३० जण दाखल आहेत. तर ४, ९५६ जणांना डिस्चार्ज दिला आहे.
...........................
४३२ जण कोरोनामुक्त
पॉझिटिव्ह रूग्णांचा आलेख वाढत असताना कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढत आहेत. ४३२ जण कोरोनामुक्त झाले असून कोरोनामुक्त रूग्णांची संख्या ११ हजार ९६२ वर पोहोचली आहे.
............................