Corona virus : पिंपरीत दिवसभरात ११५१ जण कोरोनामुक्त; ७४९ नवीन रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 12:39 PM2020-09-21T12:39:29+5:302020-09-21T12:43:05+5:30
आजपर्यंत शहरातील एकूण ५६ हजार ०९९ जण कोरोनामुक्त
पिंपरी : औद्योगिकनगरीत पॉझिटिव्ह रुग्णांचीही संख्या कमी होऊन कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. रविवारी ७४९ कोरोनाचे रुग्ण आढळले असून, ११५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील ८ आणि पुण्यातील ३ अशा एकूण ११ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ३ हजार ८८६ जणांना डिस्चार्ज दिला आहे. १ हजार ८०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात सामाजिक संसर्गास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागाच्या वतीने संशयित रुग्णांच्या तपासण्या वाढविल्या आहेत. त्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. कोरोनामुक्त होणाºयांचेही प्रमाण वाढले आहे. डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच दिवसभरात ३ हजार ४८४ जणांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले आहे. पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या नमुन्यांपैकी १८०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरातील बाधितांची संख्या ७० हजार १७२ वर पोहचली आहे. तर २ हजार ८९७ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. ३ हजार ८८६ जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ५ हजार ३७५ झाली आहे.
...........................
२८९७ जणांचे अहवाल प्रतीक्षेत
महापालिकेतील दाखल रुग्णांपैकी चाचणी प्रतीक्षेतील अहवालांची संख्या अधिक आहे. तर डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. २८९७ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. दिवसभरात ११५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरातील एकूण ५६ हजार ०९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
.....................
मृतांमध्ये वृद्धांची संख्या अधिक
शहरातील ८ आणि पुण्यातील ३ अशा एकूण ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत ११४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला-पुरुष वृद्धांची संख्या अधिक आहे.