Corona virus : कोरोनामुळे पिंपरी शहरात १५ वा बळी; येरवड्यातील वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 01:18 PM2020-05-20T13:18:11+5:302020-05-20T13:18:17+5:30
कोरोनाने पिंपरी शहरातील सहा तर पुण्यातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी : कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. कोरोनामुळे बुधवारी सकाळी येरवड्यातील ७१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने शहरात १५ वा बळी गेला आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यांत कोरोनाचा वेग वाढला आहे. शहरातील झोपडपट्ट्यांतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला तसेच दाट लोकवस्तीच्या भागातही कोरोना वाढत आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने पुण्यातील एनआयव्हीत तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा रिपोर्ट मंगळवारी आला असून, त्यात १७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर २४ तासांत एकही रुग्ण वाढला नसून सर्व रूग्ण महापालिकेच्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर मंगळवारी दिवसभरात दोन जणांचा मृत्यू झाला होता.
त्यानंतर बुधवारी सकाळी येरवड्यातील एकाचा मृत्यू झाला. पुरूषाचे वय ७१ वर्ष आहे. कोरोनाने शहरातील सहा तर पुण्यातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने आजवर १५ जणांचा बळी गेला आहे.