Corona virus : पिंपरीतील आनंदनगर, भीमनगर, सांगवीमध्ये आढळले कोरोनाचे १६ रुग्ण; बळीची संख्या २० वर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 09:16 PM2020-05-29T21:16:42+5:302020-05-29T21:17:29+5:30

पिंपरी महापालिका क्षेत्रात शुक्रवारी ४९ रुग्ण आढळले असून शहरातील रुग्णसंख्या ४९७ वर पोहचली.

Corona virus : 16 patients of Corona was found in Anandnagar, Bhimnagar, Sangvi in Pimpri; The death number of victims in the city is over 20 | Corona virus : पिंपरीतील आनंदनगर, भीमनगर, सांगवीमध्ये आढळले कोरोनाचे १६ रुग्ण; बळीची संख्या २० वर

Corona virus : पिंपरीतील आनंदनगर, भीमनगर, सांगवीमध्ये आढळले कोरोनाचे १६ रुग्ण; बळीची संख्या २० वर

Next
ठळक मुद्देआजपर्यंत २११ जण झाले कोरोनामुक्त

पिंपरी : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आनंदनगर, थेरगाव, बौद्धनगर, सांगवी, दापोडी, वाकड आणि पुण्यातील ४९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर शहरातील रुग्णांची संख्या ४९७ वर पोहोचली आहे. तर सांगवी आणि  पुण्यातील दोन व्यक्तीचा कोरोनाने बळी घेतला असून, शहरातील बळीची संख्या वीसवर गेली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या आठ दिवसांपासून रुग्णांची वाढ होत होती. ती आज कमी झाली आहे. शुक्रवारी ४९ रुग्ण आढळले असून शहरातील रुग्णसंख्या ४९७ वर पोहचली आहे. २४७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  शहरातील २८ रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील तर महापालिका हद्दीबाहेरील ४० रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर आजपर्यंत २११ जण कोरोनामुक्त झाले असून, पुण्यातील बारा  आणि पिंपरी-चिंचवडमधील आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

२७५ जणांचे अहवाल प्रलंबित
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात १४० जणांना दाखल केले आहे. त्यामुळे एकूण दाखल रुग्णांची संख्या ५५० झाली आहे. तर आज ९८ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ९८ जणांना आज डिस्चार्ज दिला आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील १८ पुरुष, २० महिला आणि पुण्यातील १०  पुरुषांचा आणि एक महिलेचा  समावेश आहे. त्यामध्ये


  किवळे, आनंदनगर, बौद्धनगर आणि पुण्यातील नागरिकांचा समावेश आहे. तर ६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज दिला आहे. त्यात आनंदनगर, चिंचवड, वाल्हेकरवाडी , रुपीनगर,  बौद्ध नगर,  भीम नगर, चरहोली,  सांगवी,  नेहरूनगर,  दापोडी, वाकड, जुन्नर , कसबा पेठ, राजगुरू नगर, देहूरोड, औंध,  खडकी, सोलापूर,  आणि पुण्यातील आंबेगाव भागातील नागरिकांचा समावेश आहे. 

शहरातील आणि पुण्यातील १४ कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामध्ये चिखली, आनंद नगर, शिवाजीनगर, बीड येथील नागरिकांचा समावेश आहे.

............................
सांगवी आणि पुण्यातील जुन्नर येथील दोघांचा मृत्यू 
सांगवी आणि पुण्यातील जुन्नर येथील व्यक्तीचा धोरणामुळे मृत्यू झाला आहे. सांगवी आणि पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह असणाºया  व्यक्तीस पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून, कोरोनाने २० वा बळी घेतला आहे. बळींमध्ये पुण्यातील १२ तर पिंपरीतील आठ जणांचा समावेश आहे.

Web Title: Corona virus : 16 patients of Corona was found in Anandnagar, Bhimnagar, Sangvi in Pimpri; The death number of victims in the city is over 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.