Corona virus : पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी १८४ जण कोरोनामुक्त; १७२ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 09:49 PM2020-10-24T21:49:56+5:302020-10-24T21:50:59+5:30
महापालिका हद्दीतील ८२,८९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे. शनिवारी दिवसभरात १७२ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८६,६३६ झाली. तर दिवसभरात १८४ जण कोरोनामुक्त झाले. १९८४ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात ८३० जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले.
शहरात शनिवारी दिवसभरात आठ रुग्ण दगावले असून, त्यात महापालिका हद्दीबाहेरील दोन जणांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १५०८ तर महापालिका हद्दीबाहेरील ६२२ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. तसेच १७५५ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून ११९४ जणांना घरी सोडण्यात आले. तर १२३१ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील २५० रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर महापालिका हद्दीबाहेरील ६२११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ८२,८९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ३७३ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.