Corona Virus : पिंपरीत बुधवारी कोरोनामुळे ४१ जणांचा बळी; आजपर्यंत एकूण ७१९ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 12:30 PM2020-08-20T12:30:59+5:302020-08-20T12:32:25+5:30
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बुधवारी दिवसभरात ८५३ रुग्ण आढळले.
पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसभरात ८५३ रुग्ण आढळले असून, १४१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील ४१जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. बुधवारी १ हजार ६४३ जणांना डिस्चार्ज दिला आहे. १६०५जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात २ हजार ३१० जणांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करून पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या नमुन्यांपैकी १६०५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरातील बाधितांची संख्या ३७ हजार ७१६ वर पोहचली आहे. तर २ हजार ८६३ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. १६४३ जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ६ हजार १४३ झाली आहे.
प्रतीक्षेत अहवाल २८६३
दाखल रुग्णांपैकी चाचणी प्रतीक्षेतील अहवालांची संख्या अधिक आहे. तर डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. २८६३ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. दिवसभरात १४१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरातील एकूण २५ हजार ३९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
४१ जणांचा बळी, पुरुषांची संख्या अधिक
शहरातील ३४ जणांचा आणि पुण्यातील ७ अशा ४१ कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात वृद्धांची, पुरुषांची संख्या अधिक आहे. आजपर्यंत ७१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.