Corona virus : पिंपरी शहरात एकाच दिवशी ४६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह; आनंदनगर झोपडपट्टी कोरोनाचा 'हॉटस्पॉट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 09:43 PM2020-05-23T21:43:21+5:302020-05-23T21:46:49+5:30

चिंचवडमधील आनंदनगर झोपडपट्टीसह पिंपरी, वाकड, भोसरी, वडमुखवाडी अशा विविध भागातील रिपोर्ट पॉझिटीव्ह

Corona virus : 46 people reported positive in one day at Pimpri city | Corona virus : पिंपरी शहरात एकाच दिवशी ४६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह; आनंदनगर झोपडपट्टी कोरोनाचा 'हॉटस्पॉट'

Corona virus : पिंपरी शहरात एकाच दिवशी ४६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह; आनंदनगर झोपडपट्टी कोरोनाचा 'हॉटस्पॉट'

Next
ठळक मुद्देआजपर्यंतची रुग्णांची संख्या ३११ वर गेली आहे. त्यातील १६९ रुग्ण बरे आजमितीला १३५ सक्रिय रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु

पिंपरी : औद्योगिक नगरीत कोरोनाचा कहर सुरुच आहे. चिंचवडमधील आनंदनगर झोपडपट्टीसह पिंपरी, वाकड, भोसरी, वडमुखवाडी अशा विविध भागातील ४६ जणांचे शनिवारी एकाचदिवशी रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये २९ पुरुष आणि १७ महिलांचा समावेश आहे. आजपर्यंतची ही सर्वांत मोठी रुग्णसंख्या आहे. सायंकाळी आठ वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णांची संख्या ३११ वर गेली आहे. त्यातील १६९ रुग्ण बरे झाले आहेत. आजमितीला १३५ सक्रिय रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराला रेडझोनमधून वगळ्यात आले आहे. कालपासून शहरातील निर्बंध शिथील केले आहे. परंतु, कालपासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. काल एकाच दिवशी २१ जणांचे तर आज आत्तापर्यंत ४६ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. आजपर्यंतची सर्वांत मोठी ही रुग्ण संख्या आहे. 
चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये आनंदनगर झोपडपट्टी, पिंपरी, वाकड, भोसरी, वडमुखवाडीतील असे ४६ रुग्णांचा समावेश आहे. तसेच पुण्यातील चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 
तर, १६९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. १३५ सक्रिय रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातील १२३ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहेत. पण, कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. आज आठ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, सात जणांमध्ये लक्षणे असून पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. आजपर्यंत शहरातील सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Web Title: Corona virus : 46 people reported positive in one day at Pimpri city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.