Corona virus : पिंपरी - चिंचवडमध्ये बुधवारी दिवसभरात ४९ नवीन कोरोनाबाधित, ३८ जण झाले कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 09:45 PM2020-06-17T21:45:37+5:302020-06-17T21:46:51+5:30
पॉझिटिव्ह रूग्ण वाढत असले तरी कोरोनामुक्त होण्याचेही प्रमाण अधिक
पिंपरी : औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून चोविस तासांत ४९ जणांना बुधवारी कोरोनाची बाधा झाली आहे. आजअखेर १३७३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या ३८ जणांना डिस्चार्ज दिला आहे. कोरोनामुळे मोशीतील ६० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. दिवसभरात शहरातील ४३ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये २८ पुरुष आणि १५ महिलांचा समोवश आहे. शहरातील शिंदेनगर, जुनी सांगवी, यमुनानगर, पंचतारानगर आकुर्डी, विशाल एस्कऐवर पिंपरी, संत तुकारामनगर भोसरी, विठ्ठलनगर, नेहरूनगर, शास्त्रीनगर, रमाबाई नगर, वैभवनगर, साईबाबानगर चिंचवड, वाल्हेकरवाडी, आनंदनगर पिंपळेगुरव, गुलाबनगर दापोडी, कुदळवाडी, कासारवाडी, शिवशाही नगर दिघी, तालेरानगर चिंचवड, पिंपरी, पिंपळेसौदागर, बौध्दनगर आणि वडगावशेरी, म्हाळुंगे, देहूरोड, येरवडा, आंबेगाव, कोथरूड या भागातील नागरिकांचा समावेश आहे. या रूग्णांवर महापालिकेच्या यशवंतरा चव्हाण स्मृती रूग्णालय आणि भोसरीतील महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
३८ जण कोरोनामुक्त
पॉझिटिव्ह रूग्ण वाढत असले तरी कोरोनामुक्त होण्याचेही प्रमाण अधिक आहे. आज आनंदनगर चिंचवड, अजंठानगर, भारतनगर, सद्गुरुकॉलनी वाकड, बौध्दनगर, अशोकनगर, सिध्दार्थनगर दापोडी, पिंपळेगुरव, पिंपरीगाव, गवळीनगर भोसरी, भाटनगर पिंपरी, वडमुखवाडी, संगमनगर जुनी सांगवी, बोपखेल, एमबी कॅम्प किवळे, खंडोबामाळ, दिघीरोड भोसरी, दत्त मंदिर वाकड, खराळवाडी, दापोडी येथील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या ३८ जणांना घरी सोडले. आजपर्यंत १३७३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ८२९ जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ५१३ सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
...........
वृद्धेचा मृत्यू
कोरोनामुळे शहरातील २४ जणांचा तर शहराबाहेरील, महापालिका रूग्णालयात उपचार घेणाºया २० अशा ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. मोशीतील ६० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला आहे.