Corona virus : पिंपरी शहरामध्ये ५७० नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; ६६४ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 12:28 PM2020-10-08T12:28:58+5:302020-10-08T12:29:27+5:30
पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरामध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून कमी होताना दिसत आहे.
पिंपरी: औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा आलेख कमी होत असल्याचे दिसून येत असून दिवसभरामध्ये ५७० रुग्ण आढळून आले आहे. ६६४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहरांमध्ये ८ जणांचा बळी घेतला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरामध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून कमी होताना दिसत आहे. महापालिकेच्या वतीने संशयितांच्या चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन कमी होऊन निगेटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
..........
२८०२ जणांना डिस्चार्ज
महापालिका महापालिका परिसरातील रुग्णालयांमध्ये आज २ हजार ७२१जणांना दाखल करण्यात आले. तर महापालिका पुण्यातील एनआयव्हीकडे रुग्णांच्या घशातील द्रवांचे नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी १ हजार ९९७ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार २४५ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. रुग्णालयात सध्या २ हजार ८२६ रुग्ण दाखल केले आहेत. तर दिवसभरामध्ये २ हजार ८०२ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.
........
आठ जणांचा मृत्यू
पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील ८ आणि शहराबाहेरील ५ अशा १३ जणांचा बळी घेतला आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील ६ पुरुष आणि २ महिला पिंपरी-चिंचवड शहराबाहेरील ४ पुरुष आणि १ महिलेचा समावेश आहे. मृतांमध्ये पुरुषांची तसेच जेष्ठ नागरिक आणि तरुणांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. आजपर्यंत मृत्यू होणाऱ्यांची संख्या १ हजार ३९६ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८१ हजार ९४२ वर गेली आहे. कोरोना मुक्त होणाºयांची संख्या ७६ हजार ०५० वर दिले आहे