Corona virus : पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात नवे ६५६ रुग्ण; ५८० जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 08:56 PM2020-07-18T20:56:12+5:302020-07-18T21:03:34+5:30
१३८७ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून, शनिवारी दिवसभरात ६५६ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच महापालिका हद्दीबाहेरील ३३ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०४४६ झाली. दिवसभरात ५८० जण कोरोनामुक्त झाले. तर १३८७ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. दिवसभरात १५ जण दगावले असून, त्यात महापालिका हद्दीबाहेरील दोघांचा समावेश आहे. मृतांची संख्या २२६ झाली. त्यात महापालिका हद्दीबाहेरील ५१ जणांचा समावेश आहे.
शनिवारी सात ज्येष्ठ नागरिकांसह खडकी येथील एका १२ वर्षीय मुलीचा समावेश आहे. आकुर्डी, पिंपरी, काळेवाडी, चिंचवड, भोसरी, निगडी, खेड, खडकी येथील रुग्णांचा मृत्यू झाला. एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविलेल्या स्वॅबपैकी ४४३ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. तसेच १६८४ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून १३८८ जणांना घरी सोडण्यात आले. तर २९९३ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील २५९ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर महापालिका हद्दीबाहेरील ५१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ६४८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ३८ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे.