Corona Virus : पिंपरी-चिंचवड शहरात नवे ८७२ रुग्ण, १६ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 09:13 PM2020-09-23T21:13:55+5:302020-09-23T21:14:17+5:30
शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या ७२ हजार ४७६ हजारावर पोहोचली
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात नवे ८३५ आणि पालिका हद्दीबाहेरील ३७ अशा ८७२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या ७२ हजार ४७६ हजारावर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ५५७ कोरोना मुक्त झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मागील आठवड्यात धोरणाचा विळखा घट्ट होत असल्याचे दिसून येत होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून एक हजारांच्या आत रुग्ण आढळून येत आहे. नवीन रुग्णांबरोबरच कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.
महानगरपालिका परिसरातील रुग्णालयांमध्ये आज ५ हजार ४२६ जणांना दाखल करण्यात आले आहे. एनआयव्हीकडे पाठवलेल्या घशातील द्रव्यांच्या नमुन्यांपैकी ४ हजार ३४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आली असून २ हजार सातशे दहा जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. तर दिवसभरामध्ये आज ५ हजार १४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.
शहरातील १५ जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील १ अशा १६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची आज नोंद झाली आहे. त्यात पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर, काळेवाडी, आकुर्डी, चिखली, चिंचवड, वाकड, रहाटनी, संत तुकारामनगर, पिंपरी, देहूरोड येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
...............
सध्या ५ हजार १९७ सक्रीय रूग्णांवर उपचार
शहरात आजपर्यंत ७२ हजार ४७६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ५८ हजार ३९६ जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील ११९० जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या ३९८ अशा १५५८ जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ५ हजार १९७ सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.