Corona virus : पिंपरीत दिवसभरात ९०५ जण कोरोनामुक्त; ८१४ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 09:26 PM2020-09-22T21:26:44+5:302020-09-22T21:27:36+5:30
पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे ..
पिंपरी : औद्योगिकनगरीत मंगळवारी ८१४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर ९०५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. शहरातील २२ आणि पुण्यातील १२ अशा एकूण ३४ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ३ हजार १९७ जणांना डिस्चार्ज दिला आहे. १ हजार ५२५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात वैद्यकीय विभागाच्यावतीने संशयित रुग्णांच्या तपासण्या वाढविल्या आहेत. तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हा उपक्रम महापालिकेने सुरू केला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे.
दिवसभरात ३ हजार १०६ जणांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले आहे. पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या नमुन्यांपैकी १ हजार ५२५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरातील बाधितांची संख्या ७१ हजार ६४१ वर पोहचली आहे. तर १ हजार ५२५ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. ३ हजार १९७ जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ५ हजार १८८ झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे.
...........................
२४६८ जणांचे अहवाल प्रतीक्षेत
महापालिका परिसरातील रुग्णालयांत दाखल रुग्णांपैकी चाचणी प्रतीक्षेतील अहवालांची संख्या कमी झाली आहे. २४६८ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. दिवसभरात ९०५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरातील एकूण ६१ हजार ९९५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
.....................
मृतांमध्ये वृद्धांची संख्या अधिक
पिंपरी-चिंचवड शहरातील २२ आणि पुण्यातील १२ अशा एकूण ३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत ११७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तरुणांची, वृद्धांची संख्या अधिक आहे.