Coronavirus | आजपासून पिंपरी-चिंचवड शहरात १२ ते १४ वयोगटातील मुलांना लस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 04:28 PM2022-03-16T16:28:49+5:302022-03-16T16:33:26+5:30

१४ वर्षावरील नागरिकांसाठी प्रत्येक केंद्रावर २०० च्या क्षमतेने लसीकरण सुरु राहणार...

corona virus children in the age group of 12 to 14 years will be vaccinated in pcmc | Coronavirus | आजपासून पिंपरी-चिंचवड शहरात १२ ते १४ वयोगटातील मुलांना लस

Coronavirus | आजपासून पिंपरी-चिंचवड शहरात १२ ते १४ वयोगटातील मुलांना लस

Next

पिंपरी : शहरातील १२ ते १४ वयोगटातील लाभार्थ्यांना बुधवारपासून (दि. १६) कॉर्बेव्हॅक्स लसीचा ( Corbevax vaccine COVID-19 vaccine) पहिला डोस देण्यात येणार आहे. कोविन ऍपद्वारे ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने ५० टक्के तर ऑन द स्पॉट लस देण्यात येईल. नागरिकांना कोव्हॅक्सिन आणि १८ वर्षावरील लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला, दुसरा, आणि प्रिकॉशन देण्यात येणार आहे.

या नागरिकांना कोविन ऍपच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुकींग पद्धतीने ३० टक्के लाभार्थी आणि ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप पद्धतीने ७० टक्के लसीकरण करण्यात येणार आहे. शहरात बुधवारी एकूण ५० केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार आहे.

१८ वर्षावरील नागरिकांना प्रत्येक केंद्रावर ३०० च्या क्षमतेने लसीकरण सुरू राहणार आहे. आठ केंद्रांवर स्तनदा माता आणि गरोदर महिलांसाठी काही डोस राखीव ठेवण्यात येणार आहेत. सकाळी ९.३० ते दुपारी ४.३० या कालावधीत लसीकरण सुरू राहणार आहे. सकाळी ८ वाजता स्लॉट बुकिंग सुरू होईल, शहरातील १२ ते १४ वयोगटातील लाभार्थ्यांना बुधवारपासून ( दि. १६ ) कॉर्बेव्हॅक्स लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका वैद्यकीय विभागाने दिली.

-१२ ते १४ वयोगटातील मुलांना आकुर्डी रुग्णालय, थेरगाव रुग्णालय, भोसरी रुग्णालय येथे लस मिळणार आहे. प्रत्येक केंद्रावर २०० च्या क्षमतेने लस देण्यात येणार आहे..

-तर १४ वर्षावरील नागरिकांसाठी प्रत्येक केंद्रावर २०० च्या क्षमतेने लसीकरण सुरु राहणार आहे.

Web Title: corona virus children in the age group of 12 to 14 years will be vaccinated in pcmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.