Corona virus : दिलासादायक! कोरोनाची रुग्णसंख्या शंभरापेक्षा कमी ; दिवसभरात १९४२ जणांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 08:33 PM2020-11-07T20:33:57+5:302020-11-07T20:34:20+5:30

दिवसभरात १६१ जण कोरोनामुक्त

Corona virus : Comfortable! Corona patients has less than a hundred; Discharge of 1942 persons during the day | Corona virus : दिलासादायक! कोरोनाची रुग्णसंख्या शंभरापेक्षा कमी ; दिवसभरात १९४२ जणांना डिस्चार्ज

Corona virus : दिलासादायक! कोरोनाची रुग्णसंख्या शंभरापेक्षा कमी ; दिवसभरात १९४२ जणांना डिस्चार्ज

Next
ठळक मुद्देशहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८८,६७८

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे. तसेच शनिवारी दिवसभरात शंभरापेक्षा कमी संख्येने नवे रुग्ण आढळून आले. शनिवारी ९७ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८८,६७८ झाली. तर दिवसभरात १६१ जण कोरोनामुक्त झाले. १८७८ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात १८६० जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले.

शहरात शनिवारी दिवसभरात महापालिका हद्दीतील चार रुग्ण दगावले. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १,५४४ तर महापालिका हद्दीबाहेरील ६३९ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. तसेच ७५७ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून १,९४२ जणांना घरी सोडण्यात आले. तर ७९० रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील १६७ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर महापालिका हद्दीबाहेरील ६,५०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ८५३७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ४०९ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

रुग्णसंख्या घटल्याने यंत्रणेवरील ताण कमी
शहरात दिवसाला हजारावर रुग्ण आढळत होते. त्यामुळे आरोग्य व वैद्यकीय यंत्रणेवर मोठा ताण होता. मात्र काही दिवसांपासून ही संख्या हजाराच्या आत आली. तर शनिवारी शंभरापेक्षा कमी संख्येने रुग्ण आढळले. त्यामळे शहरातील यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत झाली आहे. तसेच शहरातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

Web Title: Corona virus : Comfortable! Corona patients has less than a hundred; Discharge of 1942 persons during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.