Corona virus : दिलासादायक! पिंपरीत सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट; दिवसभरात ११० पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 11:45 PM2021-01-16T23:45:53+5:302021-01-16T23:46:06+5:30
१५० जण कोरोनामुक्त
पिंपरी : उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. दिवसभरात ११० जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर १५० जण कोरोनामुक्त झाले. त्यातही दिलासादायक बाब म्हणजे शहरात शनिवारी कोरोनाचा एकही रुग्ण दगावला नाही. तसेच शहरातील सक्रीय रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे.
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९८७३८ झाली आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १७८५ तर महापालिका हद्दीबाहेरील ७४५ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. शनिवारी दिवसभरात २०८१ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात १६६० जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले. २४४२ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून २०८१ जणांना घरी सोडण्यात आले. तर ६७४ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ७१ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. महापालिका हद्दीबाहेरील ७५०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ९५४१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ६२ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
सक्रिय रुग्णसंख्याही घटली
कोरोना पॉझिटिव्ह असलेले ६७४ सक्रीय रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर ८६७ रुग्णांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. असे एकूण १५४१ सक्रीय रुग्ण शहरात आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपेक्षा गृहविलगीकरण केलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या आठवड्यात १७०० पेक्षा जास्त सक्रीय रुग्ण होते. मात्र या आठवड्यात सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.