Corona virus : पिंपरीत रविवारी दिवसभरात नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 11:20 AM2020-08-24T11:20:00+5:302020-08-24T11:23:36+5:30

रविवारी ७५० नवीन कोरोना बाधित तर ७९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Corona virus : corona recovered patients number increasing than new affected in the pimpri | Corona virus : पिंपरीत रविवारी दिवसभरात नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक

Corona virus : पिंपरीत रविवारी दिवसभरात नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात एकूण 777 रुग्णांचा कोरोनामुळे बळी

पिंपरी : औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना आज प्रथमच कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली आहे.  दिवसभरात ७५० रुग्ण आढळले असून, ७९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील ६जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. रविवारी २ हजार ९७२ जणांना डिस्चार्ज दिला आहे. २ हजार ०१५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.    
 पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा विळखा वाढू लागला आहे.  संशयित रुग्णांच्या तपासण्या वाढविल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. मागील आठवड्यात सर्वाधिक अकराशे रुग्ण एकाच दिवशी आढळून आले होते. तर ४१ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हा आलेख कमी होऊ लागल्याचे दिसत आहे. दिवसभरात २ हजार ८८९ जणांना महापालिकेच्या रुग्णालयांत दाखल केले आहे. पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या नमुन्यांपैकी २ हजार ०५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरातील बाधितांची संख्या ४१ हजार ६४८ वर पोहचली आहे. तर २ हजार ४५१ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.  २ हजार ९७२ जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ६ हजार ६२९ झाली आहे.  
...........................              
२४५१ जणांचे प्रतीक्षेत अहवाल      
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दाखल रुग्णांपैकी चाचणी प्रतीक्षेतील अहवालांची संख्या अधिक आहे. तर डिस्चार्ज होणाºया रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. २४५१ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. दिवसभरात ७९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरातील एकूण २७ हजार ९५७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.        
.....................      
 शहरातील ६ जणांचा बळी, पुरुषांची संख्या अधिक            
शहरातील  ६ आणि पुण्यातील ५ अशा एकूण ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात वृद्धांची संख्या अधिक आहे. आजपर्यंत ७७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Web Title: Corona virus : corona recovered patients number increasing than new affected in the pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.